महाराष्ट्रातील कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साधारण ११ च्या सुमारास भीषण आग लागली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी नाट्यगृहात एक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर, संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त (जो ९ ऑगस्ट रोजी साजरा होणार होता) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करुन रंगकर्मी नाट्यगृहातून बाहेर पडले होते. अपघात प्रसंगी नाट्यगृह रिक्त असल्यामुळे कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. परंतु कार्यक्रमासाठी आणलेल्या सामग्रीचे आणि एकंदर नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.
Note: This is a developing story…
Fire at Keshavrao Bhosale Natyagruha in Maharashtra’s Kolhapur
उद्या, शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संगीतसूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या १३४ व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
नाट्यगृह इमारतीचे बहुतेक सामान्य लाकडी असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
अग्नीशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याबरोबरच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. या आगीवर नियंत्रण आणण्याचे काम संरक्षण दलाकडून करण्यात येत आहे. आगीने एवढे रुद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे सभागृहाचा फक्त सांगडाच राहिला आहे. या सभागृहासोबत जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक कलाकारांचे जवळचे नाते आहे.
माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिक तपशील मिळताच आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहोचवू.
कोल्हापुरातील महत्वाच्या नाट्यगृहाचे नुकसान झाल्यामुळे नाट्यरसिकांमध्ये अत्यंत दु:खाचं वातावरण पसरलेलं आहे.