कलाकार रंगमंचावर एकटा असून प्रेक्षकांना खिळवून ठेवत असेल तर तो ताकदीचा कलाकार मानला जातो. एकपात्री किंवा द्विपात्री नाट्य सादर करताना कलाकाराचा लक्षवेधी अभिनय असावा लागतो. अशाच कलाकारांच्या अभिनयाची कसोटी पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा तसेच पुरस्कृत भाजपा सांस्कृतिक सेल-उत्तर रायगड आयोजित करत आहेत ‘एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा’ वर्ष तिसरे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल हे दरवर्षी वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांचे आयोजन करतात. ‘रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा’ अस म्हणून अटल करंडक एकांकिका स्पर्धा, मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा, एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि कलाकाराच्या अविष्काराला दाद दिली जाते. या स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर होतात. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून वेगवेगळ्या नाट्य संस्था सहभागी होतात. पनवेल विधानसभेचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर आणि पनवेलचे सभागृह नेते माननीय परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्पर्धांचे नियोजन केले जाते. पहिल्यांदा एकांकिका स्पर्धेचा ब्रँड ॲम्बेसेडर ही संकल्पना अखिल भारतीय नाट्य परिषदेने ‘अटल करंडक’ मार्फत केली आणि कोकणचा कोहिनूर ‘ओंकार भोजनेला’ ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आले. कोरोना काळात नाट्यगृह बंद झाले पण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची जिद्द आणि योग्य नियोजनामुळे टाळेबंदी काळात यशस्वीरित्या स्पर्धा पार पडल्या. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ फक्त स्पर्धेचे आयोजन न करता नवीन नाटकांची निर्मितीदेखील करतात.
एकपात्री अभिनय स्पर्धा
पनवेल महानगरपालिका क्षेत्रापुरते मर्यादित.
वयोगट — १. १२ ते १८ वर्ष २. १९ व १९ च्या पुढील
पारितोषिके
प्रथम पारितोषिक रु.५,००० आणि चषक
व्दितीय पारितोषिक रु.३,००० आणि चषक
तृतीय पारितोषिक रु.२,००० आणि चषक
उत्तेजनार्थ पारितोषिक रु.१,००० (एकूण दोन पारितोषिके)
द्विपात्री अभिनय स्पर्धा
महाराष्ट्र राज्यपुरते मर्यादित.
खुले गट
विषय:विनोदी (कॉमेडी)
पारितोषिके
प्रथम पारितोषिक रु. १०,००० आणि चषक
व्दितीय पारितोषिक रु.१,००० आणि चषक
तृतीय पारितोषिक रु.७,००० आणि चषक
उत्तेजनार्थ पारितोषिक रु.५,००० (एकूण दोन पारितोषिके)
स्पर्धेचे नियम व अटी
- मराठी किंवा हिंदी भाषेत सादरीकरण करू शकता.जी भाषा निवडाल ती ८०% सादरीकरणामध्ये असावी.
- प्राथमिक फेरी ऑनलाईन तर अंतिम फेरी प्रात्यक्षिक असेल.
- मंगळवार, १६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ [email protected] या ईमेल वर पाठवावा.
- एकपात्री स्पर्धेकरीता ५०/- व द्विपात्री स्पर्धेकरीता १००/- प्रवेश फी असेल ती भरल्यावरच प्रवेश पक्का केला जाईल. कुठल्याही परिस्थितीत एकदा भरलेली प्रवेश फी परत केली जाणार नाही.
- सादरीकरण करण्यासाठी एकपात्री करताना कमीत कमी ५ मिनीटे व जास्तीत जास्त ७ मिनिटांची वेळ असेल व द्विपात्री करताना कमीत कमी ७ मिनिटे व जास्तीत जास्त १० मिनिट.
- आपले सादरीकरण अश्लील अथवा प्रक्षोभक नसावे व सामाजिक तेढ निर्माण करणारे नसावे.
- वेशभूषा, केशभूषा, संगीत आवश्यक नाही स्पर्धकांना ते आवश्यक वाटल्यास त्याची व्यवस्था स्पर्धकांनी करावी. कोणत्याही प्रकारचा खर्च स्पर्धकांना दिला जाणार नाही.
- अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या स्पर्धकांनी आपले आधार कार्डची झेरॉक्स स्पर्धेच्या वेळी आणावी. अंतिम फेरीची तारीख २७ आणि २८ ऑगस्ट आहे.
अधिक माहतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करू शकतो.
गणेश जगताप 9870116964
अमोल खेर 9820233349
सर्व रंगकर्मींना अटल करंडक ची उत्सुकता असतेच. तर एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरी दिवशी ‘अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची’ तारीख जाहीर होणार आहे. अभिनय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व कालारांना www.rangabhoomi.com कडून शुभेच्छा!