एक कुटुंब जे सुखाने राहत असतं. आई, वडील, मुलगा, मुलगी! अचानक कोरोनाची लाट पसरते आणि या घराचा आधारस्तंभ घेऊन जाते. या आणि अशा प्रकारच्या कितीतरी घटना आपण कोरोना काळात ऐकल्या. तो काळ सगळ्यांसाठीच अत्यंत कठीण गेला. या काळात कित्येकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. हसत खेळत जगणाऱ्या कित्येकांचे परिवार एकाकी झाले. काहींनी या काळात आपले आई बाबा गमावले. ज्या घरांमध्ये हसण्या-खिदळण्याचे आवाज घुमायचे त्याच घरातून आक्रोशाने रडण्याचे आवाज ऐकू येत होते. जे मागे जीवित राहिले त्यांनी स्वतःला कसं सावरलं असेल असा साधा विचार केला तरी मनाला चटका बसतो. पण त्यांनी स्वतःला सावरलं. ते लढले आणि पुढे गेले. नेमकी हीच गोष्ट आहे शिवाय मेघा फिल्म निर्मित ‘एक नातं असंही’ या नाटकाची!
Ek Naata Asahi Marathi Natak
ही गोष्ट आहे एका नात्याची. एका अशा नात्याची ज्याबद्दल बोललं तर जातं, पण त्यातल्या भावना तितक्या चांगल्या प्रकारे सांगितल्या जात नाहीत. मुंबईच्या एका कॉलनीत एक कुटुंब राहत असतं…‘देशमुख कुटुंब’. एखाद्या सामान्य कुटुंबाप्रमाणेच हे कुटुंब असतं. आई, वडील, भाऊ, बहीण या सर्वांनी भरलेलं सुखवस्तू कुटुंब! एके दिवशी देशमुख कुटुंबावर खूप मोठं संकट कोसळतं. कोरोना काळात आई-वडील दोघेही कोरोनामुळे मरण पावतात. मुलगा मोठा असल्याने घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते. त्याला गायक व्हायचं असतं. पण घरची आणि त्याच्या बहिणीची जबाबदारी त्याच्यावर पडते. म्हणून तोही त्याचं गायक होण्याचे स्वप्न सोडून देतो आणि बहिणीचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून एका कंपनीत नोकरी करतो. एके दिवशी आई-वडिलांच्या आठवणीने भावूक झाल्यावर दोघांनाही एकमेकांचे ध्येय स्वप्न नव्याने आठवतं. भावाला समजतं की आपल्या बहिणीला कवयित्री व्हायचंय. बहिणीचे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी तो खूप प्रयत्न करतो. तो त्याचं हे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतो का? त्याला कोणत्या अडचणी येतात? त्याच्या गायक होण्याच्या स्वप्नाचं पुढे काय होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘एक नातं असंही’ या नाटकाला भेट द्यावीच लागेल.
ही कथा एका भावाने बहिणीसाठी केलेल्या त्यागावर आधारित आहे, भावा बहिणीच्या गोड नात्याबद्दल भाष्य करणारी आहे. प्रेक्षक या नाटकाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. अजिबात चुकवू नका. नक्की बघा!
Ek Naata Asahi — Cast and Crew
शिवाय मेघा Films निर्मित दोन अंकी नाटक “एक नातं असंही”
संकल्पना – साक्षी देसले
लेखक – विस्मय दिपक कासार
दिग्दर्शक – दर्शन सिद्धार्थ घोलप
निर्माते – सत्यजीत सुहास भालेराव, विशाल जगन्नाथ वायकर
सहनिर्माते – अभिजीत सुहास भालेराव
नेपथ्य आणि नेपथ्य निर्माण – सुशील पांचाळ आणि मंडळी.
नेपथ्य निर्माण सहाय्य – विलास सुतार, विकास मेंगे, सुजल दळवी, अजित पांचाळ
संगीत – रुपेश मोहन जाधव
संगीत संयोजक – प्रशांत मोरे
पार्श्वगायक – नेहा राणे, प्रीतम बावडेकर.
ध्वनिमुद्रण – श्रीकृष्ण सावंत विधी व्हॅाईस स्टुडीओ लोअर परळ.
प्रकाश योजना – निखिल मारणे
प्रकाश योजना सहाय्य – साई शिर्षेकर.
रंगभूषा – श्रद्धा शेवडे
वेशभूषा – बळवंत काजरोळकर
सूत्रधार – हरी पाटणकर, सुरेश भोसले
व्यवस्थापक – शाश्वती सावंत
सोशल मीडिया – दर्शन घोलप/ओमकार दळवी.
कलाकार – विस्मय कासार, रंजना म्हाब्दी, आरती दौंड, अमोल जमादार, सुमित चौधरी, देवयानी पेंडुरकर, सुशील पांचाळ
रंगमंच व्यवस्था – महेश सावंत, अमित फेफडे, प्रणिता अहिरे, देवयानी पेंडुरकर