इमर्सिव्ह सेन्सरी अनुभव म्हणजे प्रायोगिक थिएटरचा एक प्रकार जिथे प्रेक्षक केवळ प्रेक्षक नसतात, तर प्रयोगचा सक्रिय भाग असतात. अशाच इमर्सिव्ह सेन्सरी अनुभव देणारी नाटकं घडवणारी भारतातील एक प्रमुख कंपनी म्हणजे ‘रंगाई थिएटर कंपनी‘! या कंपनीला त्यांच्या ‘द डार्करूम’ नावाच्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये प्रेक्षक आणि प्रसार माध्यांकडून भरपूर प्रशंसा मिळाली. त्यामुळे त्यांनी रंगाईच्या निर्मितीमध्ये पर्यायी घटक समाविष्ट केले आणि ‘द डार्करूम 2.0’ प्रदर्शित केले. त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच ऐन १९९ वा प्रयोग सादर झाल्यानंतर कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले आणि सर्व काही बदलले.
संपूर्ण जगाप्रमाणेच, परफॉर्मिंग आर्ट डोमेनला कोविडमुळे मोठा फटका बसला. रंगाई थिएटर कंपनीचे प्रयोग इंटीमेट पद्धतीचे असल्यामुळे आणि प्रेक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग असल्या कारणाने कोविड काळात प्रेक्षक आणि कलाकार दोघांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत होते. त्यामुळे, त्यांना लॉकडाऊन दरम्यान आयोजित करण्याचा प्रयत्न केलेले निम्म्याहून अधिक प्रयोग रद्द करावे लागले आणि त्यातूनच द डार्करूम 3.0 ची निर्मिती झाली. ज्यात कोविड सुरक्षा प्रोटोकॉलच्या अनुषंगाने सादरीकरणात बदल करण्यात आले.
द डार्करूम 3.0
अनिश्चितता आणि अजाणतेपणाचा अनुभव डोळ्यांवर पट्टी बांधून दिला जातो. प्रयोगाला आल्यावर, तुम्ही डार्करूममध्ये प्रवेश करता जिथे तुम्हाला सुगंध, छायाचित्रे आणि विविध संवेदनांचा समावेश असलेल्या विविध घटकांशी संवाद साधता येतो. असे म्हटले जाते की एक सुगंध काही आठवणी परत आणू शकतो आणि म्हणूनच प्रत्येक कथेतील विशिष्ट सुगंधाशी तुम्हाला परिचित केले जाते. कथेतील पात्रांची नियती ठरवण्याचा अधिकारही तुम्हाला दिला जातो. तर काही वेळा ते स्वतःच तुम्हाला त्यांच्या कथांमध्ये आमंत्रित करतात. ते तुमचे मित्र बनतात आणि तुमच्यासोबत काही विनोद आणि कथा शेअर करतात. आणि शेवटी, ते तुमच्याशी इतके चांगले मिसळतात की अभिनेता आणि पात्र यांच्यातील रेषा अस्पष्ट होते आणि तुम्ही आभासी वास्तविकतेकडे खेचले जाता.
द डार्करूम 3.0 ची निर्मिती
द डार्करूम 3.0 मध्ये थीमशी संबंधित असलेल्या ३० लघुकथा तयार करण्यात आल्या आणि इतर काही गोष्टींमध्येही बदल करण्यात आला. या नव्या आणि २०० व्या प्रयोगासह नव्या उत्साहाने ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ६:३० वाजता द बेस, एरंडवणे, पुणे येथे रंगाई थिएटर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे.
नव्याने सुरू होत असलेल्या द डार्करूम 3.0 च्या तिकिटांवर खास ऑफरही ठेवण्यात आली आहे. ५ किंवा अधिक तिकीट घेतल्यास प्रत्येक तिकिटावर ५०₹ सूट आणि १० किंवा अधिक तिकीट घेतल्यास प्रत्येक तिकिटावर ५०₹ सूट व २ तिकीट मोफत!
काय आहे ‘द डार्करूम 3.0’?
तीन अभिजात कथांच्या शोधाचा हा एक रोमांचकारी प्रवास आहे जो अनोख्या अनुभवात्मक पद्धतीने तुमच्यासमोर उलगडला जातो. जिथे अनिश्चितता आणि अजाणतेपणाचा अनुभव डोळ्यांवर पट्टी बांधून दिला जातो. प्रयोगाला आल्यावर, तुम्ही डार्करूममध्ये प्रवेश करता जिथे तुम्हाला सुगंध, छायाचित्रे आणि विविध संवेदनांचा समावेश असलेल्या विविध घटकांशी संवाद साधता येतो. असे म्हटले जाते की एक सुगंध काही आठवणी परत आणू शकतो आणि म्हणूनच प्रत्येक कथेतील विशिष्ट सुगंधाशी तुम्हाला परिचित केले जाते. कथेतील पात्रांची नियती ठरवण्याचा अधिकारही तुम्हाला दिला जातो. तर काही वेळा ते स्वतःच तुम्हाला त्यांच्या कथांमध्ये आमंत्रित करतात. ते तुमचे मित्र बनतात आणि तुमच्यासोबत काही विनोद आणि कथा शेअर करतात. आणि शेवटी, ते तुमच्याशी इतके चांगले मिसळतात की अभिनेता आणि पात्र यांच्यातील रेषा अस्पष्ट होते आणि तुम्ही आभासी वास्तविकतेकडे खेचले जाता.
हे सर्व फक्त ते तुम्हाला एक अनोखा आणि पैसा वसूल अनुभव देण्यासाठी धडपडत असतात.
‘द डार्करूम 3.0’ मध्ये सादर होणाऱ्या लघुकथा
दुर्गा पूजा (एक सत्य कथा)
कफन (१९३६) – मुन्शी प्रेमचंद
खोल दो (१९५२) – सआदत हसन मंटो
पुढील प्रयोग
द बेस, एरंडवणे पुणे — ३ एप्रिल, सायंकाळी ६:३० वाजता
सीबांबई, काळाघोडा, पुणे — १६ एप्रिल, सायंकाळी ६:३० वाजता
राह साक्षरता आणि सांस्कृतिक क्लब, लुल्लानगर, पुणे — ३० एप्रिल, सायंकाळी ७:३० वाजता
तर मग तुम्ही इमर्सिव थिएटरचा अनुभव घेण्यासाठी तयार असाल, तर रंगाई थिएटर कंपनी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे.