एखाद्या कादंबरीवर आधारित नाटक करताना अवाढव्य कथेला कमीत कमी वेळात मांडताना लेखकाचे कस लागतात आणि नाटकाची संहिता लिहताना कथेचा आणि पात्रांचा पूर्ण अभ्यास करावा लागतो. या दोन्ही गोष्टींचा विचार भद्रकाली प्रोडक्शन्सने केला. भद्रकाली प्रोडक्शन्स घेऊन येत आहेत दृष्टी आणि कृष्णकिनारा अशी दोन कादंबरीवर आधारित नाटके तसेच भद्रकाली प्रोडक्शन्स निर्मित संगीत देवबाभळी नाटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
भद्रकाली प्रोडक्शन्स
यंदाच्या वर्षी या संस्थेला ४० वर्ष पूर्ण झाली. ‘चाकरमानी’ या नाटकापासून सुरुवात केली आणि दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणारे नाटक करत या वर्षी नवीन नाटकांची निर्मिती करण्यात येणार आहे पण ती नाटके कोणती असणार हे अजून गुपित असून याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येते. भद्रकाली या संस्थेने नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि कोरोना काळात बिकट परिस्थितीमुळे नाट्यकर्मींना मदत करून नाटकाचा वारसा आणि रंगभूमी जपण्याचे कार्य सातत्याने केले व पुढे ही करतील.
कृष्णकिनारा आणि दृष्टी
अनंत सामंत लिखित दृष्टी आणि डॉ. अरुणा ढेरे यांनी लीहलेल्या कृष्णकिनारा या दोन सहित्यांवर आधारित दोन नाटक निर्मित करण्यात येणार आहेत. या सहित्यांना अनेक वाचकांनी भव्य प्रतिसाद दिला. कथेचे नाट्यरूपांतर करणाऱ्या लेखकाचे आणि दिग्दर्शकाचे नाव प्रेक्षकांपर्यंत पोहचले नसले तरी सोशल मीडिया मार्फत प्रेक्षक उत्सुकता दर्शवत आहेत.
संगीत देवबाभळी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
संगीत देवबाभळी हे व्यावसायिक रंगभूमीवरून प्रेक्षकांमध्ये रंगलेले नाटक. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केले असून ३०० हून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. लाभलेल्या लखुबाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान आणि संसारी आवलीच्या साध्या प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी हा देवबाभळी नाटकाचा विषय आहे. देवबाभळी हे पुस्तक प्राजक्त देशमुख यांनी लीहले असून आता ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी देवरूख शिक्षण मंडळाने या नाटकाचा अभ्यासक्रमात समावेश केला होता. असे मोठे यश आणि ४२हून अधिक पुरस्कार विजेते हे नाटक पुन्हा नाट्य दिंडी करत आहे. या नाटकाची अधिक माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंक वर भेट द्या.
भद्रकाली संस्थेला रंगभूमी.com कडून पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा!