संहिता निर्मित आणि प्रयोगशाळा आयोजित ‘बे एके बे’ हा एक अनोखा कार्यक्रम शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता, रवींद्र नाट्य मंदिर (मिनी थिएटर) येथे सादर होणार आहे. गीत, काव्य आणि संगीताची एक अनोखी मैफल जी आपल्याला आयुष्याचा पाढा शिकवते आणि मग आपणही म्हणू लागतो.. बे एके बे…!
या प्रयोगाची खासियत म्हणजे नवोदित कवींच्या कविता, कवितेची झालेली गाणी आणि शब्दसुरांनी भावविवश करणारी अशी ही मैफल असणार आहे. सादर होणाऱ्या या कविता प्रेक्षकांचे बालपणीचे भावविश्व उलगडतात, तरुण वयातलं प्रेम जागवतात आणि जगरहाटीच्या खेळात येणाऱ्या अनेक अनुभवांची अनुभूती देतात. इथले सूर मंत्रमुग्ध करतात, डोलायला लावतात आणि नाचावतातही! त्यामुळे, आजच्या धावपळीच्या जीवनात क्षणभर विश्रांती आणि मनभर आनंदासाठी ‘बे एके बे’ या कार्यक्रमाला भेट द्यायलाच हवी.
लेखक/कवी विनोद गायकर, कवी/गीतकार डॉ. गजानन मिटके, आंतरराष्ट्रीय शीळवादक निखिल राणे, सुलेखनकार अमोल मिटकर या गुणी कलावंतांच्या कविता, कवितांची झालेली गाणी आणि अनुभवांची बेरीज वजाबाकी, याचं सुश्राव्य समीकरण प्रेक्षकांना या रसभरीत मैफिलीत अनुभवता येणार आहे.
या संपूर्ण सोहळ्याचे प्रवेशमूल्य निव्वळ १००/- आकारण्यात आलेले असून तिकिटासाठी पुढील क्रमांकांवर संपर्क करू शकता.
तिकिटांसाठी संपर्क: ९००४४९३०६१ आणि ९७७३४४४४८३
तसेच, प्रयोगाच्या एक तास आधी नाट्यगृहावरही तिकिटे उपलब्ध होणार आहेत.
प्रयोगशाळेतर्फे भविष्यातही याच प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत. ज्याबद्दल आम्ही वेळोवेळी माहिती देतच राहू. तोपर्यंत या काव्यमय मैफिलीचा रसिक प्रेक्षक पुरेपूर आस्वाद घेतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो.