लॉकडाऊनच्या विळख्यातून नुकतीच बाहेर पडलेली रंगभूमी हळूहळू उजळू लागलेली आहे. सर्वच रंगकर्मी नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपल्या मनोरंजनासाठी कंबर कसून तयार होताना दिसतायत. अशातच प्रेक्षकांच्या भेटीस आतुर अशा बऱ्याच नाटकांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. असंच एक तग धरून बसलेलं नाटक म्हणजे झी नाट्य गौरव पुरस्कृत ‘बार्दो‘!
शंतनू चंदात्रे लिखित आणि अनुप माने दिग्दर्शित बार्दो या नाटकाला झी नाट्य गौरव २०२० मध्ये सर्वाधिक ५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
- सर्वोत्कृष्ट लेखन – शंतनू चंदात्रे
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – अनुप माने
- सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – यश नवले
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य – अमेय भालेराव
- आणि सर्वोत्कृष्ट लक्षवेधी नाटक
बार्दो या नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता कालिदास, नाशिक येथे सादर होणार आहे.
तिबेटी बौध्द धर्मात बार्दो ही संकल्पना मृत्यूनंतर आणि पुनर्जन्माच्या आधीची अवस्था आहे. हे नाटक मृत्यूच्या पलीकडे असलेल्या एका वेगळ्या मितीत प्रेम, असक्ती, वैमनस्य आणि जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतं.
या प्रयोगाची तिकिट विक्री bookmyshow द्वारे पुढील लिंकवर ऑनलाईन माध्यमातून सुरू आहे.
बार्दो नाटकाची तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा.
तसेच ७०३०६३६९०६ या क्रमांकावर फोन करूनही तुम्ही तिकीट बुकींग करू शकता.
‘बार्दो’ नाटकाचे वर्णन करताना दिग्दर्शक अनुप माने यांनी सांगितले की, “तिबेटी बौध्द धर्मात बार्दो ही संकल्पना मृत्यूनंतर आणि पुनर्जन्माच्या आधीची अवस्था आहे. हे नाटक मृत्यूच्या पलीकडे असलेल्या एका वेगळ्या मितीत प्रेम, असक्ती, वैमनस्य आणि जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतं.”
वर्णन ऐकूनच काहीतरी सुंदर कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे याबद्दल वादच नाही. त्यामुळे या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग सादर होऊन हे नाटक अगणिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू देत अशी सदिच्छा आपण सगळ्यांनीच व्यक्त करूया आणि नाशिकच्या प्रयोगाचेही मन:पूर्वक स्वागत करूया!
1 Comment
Pingback: बार्दो — झी नाट्य गौरव २०२० सर्वाधिक ५ पुरस्कार प्राप्त नाटक — याचा नाशिक येथे पहिला प्रयोग – Gayat