मराठी नाट्य सृष्टीला पु. ल. देशपांडे, प्रा. लक्ष्मण देशपांडे, मधुकर टिल्लू, सदानंद चांदेकर, सुमन धर्माधिकारी, सुषमा देशपांडे असे दिग्गज कलावंत लाभले, ज्यांनी एकपात्री नाट्यकलेला उंची मिळवून दिली. ताकदीचा कलाकार ही दाद मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रामाणिक अभिनयाची आवड जपावी लागते, कष्ट घ्यावे लागतात आणि सध्याच्या युवा कलाकारांचा अभिनय क्षेत्रात रस निर्माण होत आहे. अशा कलाकारांसाठी बालगंधर्व कला अकादमी परिवार आयोजित करत आहे राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा.
बालगंधर्व कला अकादमी
अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या बालगंधर्व कला अकादमीने अनेक कलाकार घडवले. या अकादमीमार्फत थिएटर, दूरदर्शन याबद्दल शिक्षण दिले जाते. तसेच, अभिनय, नृत्य अशा अनेक कलागुणांना जपले जाते. कलाकारांसाठी अनेक कार्यशाळा घेण्यात येतात.
यावर्षी बालगंधर्व कला अकादमीतर्फे संगीत एकांकिका स्पर्धाही आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धेचे नियम व अटी:
- स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन स्वरूपात होणार असून अंतिम फेरी प्रत्यक्ष स्वरूपात होईल.
- प्रवेश करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२२ तर प्रवेश शुल्क फक्त २००/- आहे.
- भारतातील कोणतेही कलाकार भाग घेऊ शकतात. तसेच, वयाची मर्यादा नाही.
- या स्पर्धेत सुप्रसिध्द सिने आणि नाट्य अभिनेता, अभिनेत्री, निर्माता आणि दिग्दर्शकांचे मार्गदर्शन लाभण्याची सुवर्णसंधी आहे.
- ही स्पर्धा इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीन भाषेत होईल.
- महाअंतिम फेरी १४ ऑक्टोंबर रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे होईल.
- व्हिडिओ पाठवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधा – ९८९२९०३०७६ / ९८९२९०३०७१
पारितोषिके
प्रथम पारितोषिकः २००० रुपये
द्वितीय पारितोषिक: १५०० रुपये
तृतीय पारितोषिकः १००० रुपये
विशेष उत्तेजनार्थ : २ पारितोषिके
प्रोत्साहनपरः २० पारितोषिके
सर्व सहभागी कलावंतांना प्रशस्तीपत्र आणि बालगंधर्व अकादमी वतीने अविस्मरणीय अशी छोटीशी भेटवस्तू गिफ्ट म्हणून देण्यात येईल.
सर्व सहभागी कलाकार स्पर्धकांना आणि बालगंधर्व कला अकादमीला रंगभूमी.com कडून शुभेच्छा.