कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर आहे, हे आपण सर्वच जाणतो. कलाक्षेत्रात अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात, प्रेक्षक आणि नाट्यसंस्था यांची मांदियाळीच आहे. आजही अनेक नाट्यसंस्था या नाटक, एकांकिका व अभिवाचन यांचे सादरीकरण अथवा नाट्यप्रशिक्षणाची शिबिरे आयोजित करत असतात. त्यातलीच एक जुनी व नावाजलेली संस्था म्हणजे, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर! या संस्थेला मूळ वारसा हा संगीताचा असला, तरी नाट्य चळवळीत या संस्थेचा नाट्यविभाग नेहमी कार्यरत असतो व तशी नाट्य परंपरा देखील या विभागाला लाभलेली आहे.
वाचिक अभिनय ही वाणी, बोलणे आणि शब्दोच्चारातून भावना व्यक्त करण्याची कला आहे. नाट्यवाचन, कथाकथन, आकाशवाणीवरून होणारी नभोनाट्ये ही वाचिक अभिनयाची काही उदाहरणे आहेत. शब्दाच्या केवळ उच्चारावरून पात्राची ओळख झाली पाहिजे. त्याचे वय, व्यवसाय, मानसिक अवस्था त्यातून प्रगट झाली पाहिजे अशी यात कल्पना असते.
गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या नाट्यविभागाने, ‘वाचिक अभिनय’ नाटकात किती महत्त्वाचे असते, हे मांडण्यासाठी एक अभिवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. ज्याचे नाव आहे, नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर स्मृती, कन्स्ट्रोसिस करंडक राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा! गेली दोन वर्षे ही राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा, कोल्हापुरात मोठ्या उत्साहाने पार पाडली जाते. मागच्या वर्षी २०२३ ला महाराष्ट्रभरातून तब्बल २७ संघांनी या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत सहभाग घेतला होता. याही वर्षी राज्यभरात या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कलाकार तत्पर आहेत.
नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर स्मृती, कन्स्ट्रोसिस करंडक २०२४ राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा १४ व १५ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी ७ ऑगस्ट २०२४ ही अंतिम तारीख असून या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेचे प्रवेश शुक्ल हे फक्त ३००/- रुपये आहे.
स्पर्धेची पारितोषिके
सांघिक
प्रथम क्रमांक रू. ५०००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक रू. ३०००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक रू. २०००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ दोन रू. १०००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
वाचिक अभिनय पुरुष व स्त्री
प्रथम क्रमांक रू. ७००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक रू. ५००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक रू. ३००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
दिग्दर्शन
प्रथम क्रमांक रू. ७००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक रू. ५००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक रू. ३००/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
प्रवेशिका अर्ज तुम्हाला पुढील लिंकवर मिळतील.
https://surveyheart.com/form/6698ac80401855188cdf83aa
या स्पर्धेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा काही शंका असेल तर पुढील क्रमांकांवर संपर्क साधा.
श्रेयस सोनार — 957997 2508 / गायत्री कुंभार — 788786 3100
या राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेचे प्रायोजक हे, कन्स्ट्रोसिस वॉटरप्रुफिंग सिस्टम्स्, कोल्हापूर – पुणे आहेत.
नाटकातील ‘वाचिक अभिनयाचे’ महत्त्व जाणणाऱ्या या नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर स्मृती, कन्स्ट्रोसिस करंडक २०२४ राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेला व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना, रंगभूमी.com तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा!