तमाम कलाकारांसाठी एक खुशखबर आहे. मालाडमध्ये लवकरच खुला होत आहे एक रंगमंच! मालाड पश्चिम मधील ‘आरोग्यम धनसंपदा’ या संस्थेच्या अध्यक्षा अनघा म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ उभारला आहे.
आरोग्य, खेळ, गायन आणि नृत्य अशा विविध कलागुणांना जोपासणाऱ्या या संस्थेने नाट्यकलेला साद घालत कलाक्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. या नव्या रंगमंचाच्या शुभारंभाप्रीत्यर्थ सात दिवसीय नाट्यमहोत्सवाची घोषणाही करण्यात आली आहे. या प्रायोगिक नाट्यमहोत्सवाचे उदघाटन अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. उदघाटन सोहोळयाचे सूत्र संचालन कवी अरुण म्हात्रे करणार आहेत
महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका www.rangabhoomi.com/tickets येथे उपलब्ध आहेत. लेखाच्या शेवटी दिलेले पर्याय वापरूनही तुम्ही या प्रवेशिका बुक करू शकता.
आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच
मालाडमधील लिबर्टी गार्डन जवळील “आरोग्यम धनसंपदा” ची स्थापना २६ मे २००२ रोजी झाली. आरोग्य, खेळ, गायन आणि नृत्य या विविध अंगांचे मूल्य जोपासित “आरोग्यम धनसंपदा” या संस्थेने मालाडमधील रहिवासीयांसाठी एक सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
‘योग’ या मानसिक आरोग्य जपणाऱ्या आध्यात्मिक प्रकारापासून ते ज्यूडो, टेबल टेनिस, कबड्डी, बॉक्सिंग, स्केटिंग या शारीरिक आरोग्य जपणाऱ्या खेळांपर्यंत, गायनकलेपासून ते नृत्यकलेपर्यंत तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायामशाळा, अश्या विविध कला-क्रीडा प्रकारांची जोपासना “आरोग्यम धनसंपदा” मध्ये केली जाते. आज या संस्थेत प्रशिक्षण घेतलेले काही खेळाडू महाराष्ट्राचे, भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत आणि थेट ओलिम्पिकसच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहेत.
गेल्या २० वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर संस्था एक नवीन सांस्कृतिक पाऊल उचलत आहे. ते पाऊल म्हणजे “आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच“
या आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंचाचा शुभारंभ म्हणून “प्रयोगिक नाट्य महोत्सव” आयोजित करण्यात येत आहे. १६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सादर होणाऱ्या प्रायोगिक नाटय महोत्सवात ५ प्रायोगिक नाटके आणि ४ एकांकिका सादर होतील.
या ७ दिवसांच्या प्रायोगिक नाटय महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सादर होणाऱ्या नाटकाची देणगी प्रवेशिका ₹२०० असेल. संपूर्ण नाटय महोत्सवासाठीची देणगी प्रवेशिका ₹१,२०० असेल. प्रवेशिका घेण्यासाठी येथे क्लिक करा.
आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच आयोजित
प्रायोगिक नाटय महोत्सव २०२२
रविवार दि. १६ ऑक्टोबर, २०२२ ते शनिवार दि. २२ ऑक्टोबर, २०२२
दररोज सायं. ७.३० वाजता
स्थळ – आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच, आरोग्यम धनसंपदा, जय किरण बिल्डिंग जवळ, लिबर्टी गार्डन, मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४
प्रायोगिक नाटय महोत्सव २०२२ वेळापत्रक
१६ ऑक्टोबर २०२२ (रविवार)
दास्तान-ए-रामजी (मराठी)
संस्था: The Shakti Ensemble
मूळ लेखक: दि. बा. मोकाशी
रंगावृत्ती आणि सादरीकरण: अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी
१७ ऑक्टोबर २०२२ (सोमवार)
१. एक शर्त (हिंदी एकांकी)
संस्था: Actor’s Studio
मुल लेखक: आंतोन चेकॉव्ह
हिंदी अनुवाद: अनुराधा महेंद्र
निर्देशक: प्रेम नाथ गुलाटी
२. जाति का है? (हिंदी एकांकी)
लेखक: हरिशंकर परसाई
निर्देशक: दिलीप पांडेय
१८ ऑक्टोबर २०२२ (मंगळवार)
फंदी (मराठी)
संस्था: प्रयोग मालाड
मूळ हिंदी लेखक: डॉ शंकर शेष
मराठी रूपांतरण: डॉ वसुधा सहस्त्रबुद्धे
दिग्दर्शक: उन्मेष वीरकर
१९ ऑक्टोबर २०२२ (बुधवार)
काठपदर (मराठी)
संस्था: ‘लक्ष्मणझुला’ थिएटर्स, प्रभादेवी
लेखक: प्रा. दिलीप जगताप
दिग्दर्शक: राजू वेंगुर्लेकर
२० ऑक्टोबर २०२२ (गुरुवार)
प्रणाम भारत (मराठी)
संस्था: नाट्यसंपदा कलामंच
संकल्पना: अनंत वसंत पणशीकर
दिग्दर्शक: डॉ अनिल बांदिवडेकर
२१ ऑक्टोबर २०२२ (शुक्रवार)
१. तांडव (मराठी एकांकिका)
संस्था: रंगफौज, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
लेखन-दिग्दर्शन: रावबा गजमल
२. मसनातलं सोनं (मराठी एकांकिका)
नाट्यलेखन-दिग्दर्शन: रावबा गजमल
२२ ऑक्टोबर २०२२ (शनिवार)
अधल्या मधल्याची गोष्ट (मराठी)
संस्था: रंगवेध
मेघना पेठे यांच्या कथेवर आधारित
रंगवृत्ती, नेपथ्य आणि दिग्दर्शन: विलास पागार
देणगी प्रवेशिका − ऑनलाइन बुकींग
देणगी प्रवेशिका येथे उपलब्ध आहेत →
[purchase_link id=”12711″ text=”Book Tickets Now” style=”button” color=”has-edd-button-background-color has-edd-button-text-color”]
(If you face any issues while booking, please message us on WhatsApp at +91-999-256-256-1)
हा नवा रंगमंच आणि रंगमंचावर सादर होणाऱ्या कलाकृती समस्त कलाकार व प्रेक्षकवर्गासाठी येत्या काळात एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे, या आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंचावर तुमच्या शुभाशिर्वादांचा वर्षाव होऊ देत हीच सदिच्छा!