२०२० साली, २७ मार्च रोजी म्हणजेच जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभमुहूर्तावर रंगभूमी.com ची स्थापना झाली. सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गेली ४ वर्षे आम्ही सातत्याने नाट्यक्षेत्रात कार्यरत आहोत. आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही ‘नाट्यदरबार #२’ ची घोषणा करत आहोत. आमच्या पहिल्यावहिल्या नाट्यदरबाराला तुम्ही जसा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दिलेला तसाच तो याही नाट्यदरबाराला द्याल याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला हे सांगावयास अतिशय आनंद होत आहे की यावेळी, अवतरण अकादमी ही संस्था या उपक्रमात आमच्यासोबत जोडली गेली आहे.
एप्रिलच्या पहिल्या रविवारी, ७ एप्रिल रोजी आम्ही घेऊन येत आहोत अवतरण अकादमी प्रस्तुत आणि रंगभूमी.com आयोजित कार्यक्रम ‘नाट्यदरबार #२’! बोरीवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरातील लघु नाट्यगृह (मिनी थिएटर) येथे रात्रौ ८:३० वाजता भरणार आहे दर्जेदार नाट्यनुभवांचा नाट्यदरबार!!!
तिकीट शुल्क, ऑनलाईन बुकिंग लिंक, दाखवण्यात येणारे नाट्यनुभव आणि इतर माहितीसाठी पुढे वाचा.
नाट्यदरबार #२
दोन स्त्री एकपात्री दीर्घांक बघण्याची सुवर्णसंधी!!!
१. शक्तिमानने स्कर्ट का घातलाय?
अभिनेत्री: भाग्यश्री पवार
दिग्दर्शक: तेजस कुलकर्णी
मूळ इंग्रजी नाटक: Why is John Lennon Wearing a Skirt?
मूळ लेखक: Claire Dowie
मराठी अनुसर्जन: भाग्यश्री, तेजस
१६+ वयोमर्यादा अनिवार्य
२. यात्रा
एक अभिनेत्री, १२ व्यक्तिरेखा
अभिनेत्री: सुकन्या गुरव
लेखक-दिग्दर्शक: मुक्ता बाम
‘नाट्यदरबार #२’ तिकीट बुकिंग
नाट्यदरबार #२ चे तिकीट शुल्क फक्त ₹२०० आहे! आणि बुकिंग करणाऱ्या पहिल्या २५ भाग्यवान प्रेक्षकांना तिकीट दरात विशेष सवलतही मिळणार आहे! त्यामुळे त्वरा करा! आजच तिकिटे बुक करा.
Early Bird Pricing (First 25 Buyers only)
तिकीट शुल्क ₹१६० फक्त!!!
Need help with ticket booking? Message us on WhatsApp
‘नाट्यदरबार’ म्हणजे नेमकं काय?
२०२० ते २०२४ या काळात रंगभूमी.com च्या निमित्ताने बरीच नाटकं बघण्याचा योग आला. खरं तर आम्हाला नाटकांचे बरेच ‘प्रकार’ बघायला मिळाले. एकांकिका, दीर्घांक, दोन अंकी नाटक, तीन अंकी नाटक, लघुनाटिका आणि बरंच काही! बऱ्या-वाईट-चांगल्या अशा कित्येक नाट्यानुभवांचा ओघ आजही अव्याहत सुरू आहे. या ओघात वाहत आलेल्या नाट्यकृतींपैकी काही नाटकांनी मनात असं काही घर केलंय की ती नाटकं जिवंतपणी विस्मृतीत जाणं निव्वळ अशक्यच! आपल्याला आवडलेली ही सुंदर नाटकं रंगभूमी.com च्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना समोर आली. सहकाऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली. बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आम्ही ७ मे रोजी पहिलावहिला ‘नाट्यदरबार’ भरवला!
नियम व अटी
१. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.
२. एका तिकिटावर एका प्रेक्षकाला प्रवेश मिळेल.
३. कार्यक्रम सुरु होण्याआधी कमीत कमी १० मिनिटे अगोदर नाट्यगृहाकडे पोहोचणे अनिवार्य आहे.
४. आमच्या टीमकडून Wrist-band दिले जातील. ते दाखवूनच प्रवेश मिळेल.
५. दोन्ही दीर्घांकांच्या मधल्या वेळेत अल्पोपहारासाठी १५-२० मिनिटांचे एक मध्यांतर असेल.
६. बाहेरील पदार्थ नाट्यगृहात आणण्यास सक्त मनाई आहे.
७. १६+ वय अनिवार्य आहे.
आमच्या येणाऱ्या नाट्यदरबारांनाही तुम्ही उदंड प्रतिसाद द्याल याची आम्हाला खात्री आहे.