महाविद्यालयाचे नवीन वर्ष सुरू होताच नवीन एकांकिकांच्या तालमीला सुरुवात होते. नव्या वर्षाचा नवा जल्लोष आणि जिंकण्याच्या उमेदीने स्पर्धेत भाग घेतला जातो. एकांकिका विश्व हे छोट्या मंचावरील मोठ्या स्वप्नांचे प्रतीक आहे. अवघ्या महाराष्ट्रात विविध भागात मानाच्या आणि उच्च पातळीवर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होत असतात. अशीच एक मुंबईतील दादरकरांची अमर हिंद मंडळ तर्फे आयोजित कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा! अमर हिंद मंडळ (दादर) या साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात अग्रणी असलेल्या समाजसेवी संस्थेतर्फे रंगकर्मीना प्रोत्साहन देण्यासाठी ही एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते.
यावर्षी ‘कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२४’ ची प्राथमिक फेरी तालीम स्वरुपात शुक्रवार दि. १८ ते रविवार दि. २० ऑक्टोबर या तीन दिवशी मंडळाच्या सभागृहात आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी अर्ज भरायची शेवटची तारीख-वेळ १३ ऑक्टोबर ४ वाजेपर्यंत असून त्याच दिवशी संध्याकाळी ६.३० वाजता लॉट्स काढले जातील. अंतिम फेरी बुधवार दि. २३ ऑक्टोबर रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे होईल.
आपल्या कलात्मक वृत्तीला चालना देण्यासाठी लवकरात लवकर सहभागी व्हा!
प्रवेश अर्ज येथे भरा!
प्रवेश अर्जासाठी येथे क्लिक करा.
कै. आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे नियम व अटी
- ही स्पर्धा हौशी कलावंतासाठी आणि सर्व मान्यताप्राप्त संस्थासाठी खुली आहे. स्पर्धक संस्था स्पर्धेत नवीन अथवा जुन्या एकांकिका सादर करू शकतात मात्र लेखनाचे पारितोषिक नव्या एकांकिकेसाठीच राहील.
- या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुल्क रु. ५००/- आहे.
- एकांकिकेला आशय /विषयाचे बंधन नसेल परंतु भाषेचे माध्यम मात्र मराठी असले पाहिजे.
- एका व्यक्तीला कलावंत म्हणून कोणत्याही एकाच एकांकिकेत सहभागी होता येईल.
- एकांकिकेंचा कालावधी कमीत कमी ३५ मिनिटे व जास्तीत जास्त ४५ मिनिटे एवढा असेल.
- स्पर्धेत सादर होणारी एकांकिका किमान २ पात्रांची असावी.
- प्रत्येक संस्थेने आपल्या कलावंत, तंत्रज्ञा सह एकांकिका सादर करण्यासाठी, सादरीकरण वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्राथमिक फेरीसाठी स्पर्धक संस्था आल्याची नोंद करताना स्पर्धक संस्थेने एकांकिकेच्या तीन प्रती, लेखकाची परवानगी, एकांकिका सेन्सॉर प्रमाणपत्राची प्रत, नेपथ्याचा आराखडा, कलावत तंत्रज्ञ यांच्या यादीच्या प्रती आयोजकांकडे उपलब्ध असलेल्या छापील तक्त्यातच भरुन आयोजकांकडे सुपूर्द कराव्यात.
- अंतिम फेरीसाठी निवड न झालेल्या स्पर्धक संस्थांना ह्या गोष्टी शनिवार दि २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं १.०० ते ८.०० या वेळेत परत करण्यात येतील.
- आयोजकांना प्रवेश फी भरल्याची पावती दाखवून त्या त्यांनी त्याच वेळी नेणे आवश्यक आहे. नंतर सदर गोष्टी परत करण्याची जबाबदारी आयोजकांवर असणार नाही
- प्राथमिक फेरीचा निकाल आणि अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिकांच्या सादरीकरणाचा क्रम प्राथमिक फेरी संपल्यावर लगेच जाहीर करण्यात येईल.
- प्राथमिक व अंतिम फेरीसाठी परीक्षक आयोजकांतर्फे ठरवण्यात येतील व त्यांचा निर्णय अंतिम राहील.
- स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १.०० वाजता यशवंत नादय मंदिर, माटुंगा येथे घेण्यात येईल. अंतिम फैरीचा निर्णय स्पर्धा संपल्यावर परीक्षक जाहीर करतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अंतिम फेरीचा निर्णय लागल्यानंतर तिथेच होईल.
- संस्थाना, कलाकार आणि तंत्रज्ञांना देण्यात येणारी पारितोषिके धनादेशाद्वारे देण्याचा निर्णय अमर हिंद मंडळाच्या कार्यकारी समितीने घेतला असल्यामुळे संस्थाना धनादेश देण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही स्पर्धक संस्थेला प्राथमिक फेरीत सहभागी झालेले कलावंत, तंत्रज्ञ अंतिम फेरीत बदलता येणार नाहीत. अपवादात्मक परिस्थितीतही कलावंत तंत्रज्ञ बदलण्यास संमती देणे व न देणे आयोजकांवर अवलंबून राहील.
- अंतिम फेरी सादरीकरणासाठी प्रत्येक संस्थने कलावंत, तंत्रज्ञासह सादरीकरणाच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्पर्धा सादरीकरण्याच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- अंतिम फेरीतील संस्थांना, एकांकिकाच्या प्रयोगापूर्वी पूर्वतयारीसाठी फक्त १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. दिलेल्या कालावधीत आणि पुरवलेल्या सामुग्रीतच नेपथ्य, प्रकाश योजना असणे प्रत्येक संस्थेला बंधनकारक राहील.
- प्राथमिक फेरीत सादर झालेल्या परंतु अंतिम फेरीत दाखल न झालेल्या एकांकिकेतील ३ लेखक, ३ दिग्दर्शक आणि ३ कलाकारांना प्रत्येकी रु. २५०/- आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
- एका संस्थेकडून एकच प्रवेशिका दाखल करता वैईल.
- प्रवेश अर्ज प्रत्यक्ष सकाळी ११.०० ते दुपारी ०२.०० आणि सायंकाळी ०५.०० ते ०८.०० या वेळेत दिले जातील.
- एकांकिका स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.२५,०००/- द्वितीय पारितोषिक रु.२०,०००/- आणि तृतीय पारितोषिक १५,०००/- व अंतिम फेरीत सहभागासाठी रु.५,०००/- देण्यात येतील.
- स्पर्धेसाठी नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेच्या नियमावलीत तसेच आयोजन वेळापत्रकात अपरिहार्य अपवादात्मक स्थितीत बदल करण्याचे अधिकार स्पर्धा आयोजन समितीस राहतील.
स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी श्री. राजेंद्र कर्णिक ९८२०६३०१४२, तेजल देखपांडे ९८२०७४०००४ समीर चव्हाण ९८२१८१२३३८ आणि तेजखी भोसले ७४९८१८७४१४ यांच्याकडे संपर्क साधावा.
प्रवेशासाठी अमर हिंद मंडळ, अमरवाडी, मोखाने रोड उत्तर, दादर, मुंबई ४०० ०२८ येथील कार्यालयास भेट द्यावी. किंवा आपण आपले प्रवेश अर्ज ऑनलाईन व प्रवेश फी UPI ने ही पाठवू शकता अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.