समृद्ध आणि सशक्त अशा मराठी रंगभूमीने अनेक उत्तमोत्तम नाटके आतापर्यंत रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आहेत. आजच्या घडीला “अमर फोटो स्टुडिओ ” हे नाटक असंच सद्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले दिसतं मनस्विनी लता रविंद्रची संहिता असलेलं, निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन लाभलेलं हे रंजक नाटक, प्रदिप मुळ्येचं कल्पक नेपथ्य, शीतल तळपदेची सुयोग्य प्रकाशयोजना यामुळे एक वेगळीच उंची गांठते. सुव्रत जोशी, अमेय वाघ, पर्ण पेठे, पूजा ठोंबरे व सिद्धेश पूरकर यांचा भूमिकांना यथोचित न्याय देणारा पूरक अभिनय बऱ्यापैकी लक्षात रहातो.
टाइम मशीन किंवा कालयंत्र या चमत्कृतीपूर्ण विषयावरील एच जी वेल्सची “टाइम मशीन” कादंबरी, जे. बी. प्रिस्टलेचे शोज, फॉक्स चॅनेलवर सद्या सुरु असलेली “लॉस्ट” टीव्ही मालिका अशा भूत, भविष्य आणि वर्तमान यांची उत्कंठावर्धक व मसालेदार सांगड असलेल्या गोष्टी युरोपियन समाजाला नवीन नाहीत किंबहुना त्यांना त्या जास्तच भावत असाव्यात. आपल्याकडे या गोष्टींचा रंगमंचीय उपयोग तुरळकपणे झालेला दिसतो.
अमर फोटो स्टुडिओ हि अशीच उत्कंठावर्धक व अफलातून फँटसी आहे, आणि तिने प्रेक्षकांच्यामनावर चांगलेच गारुड केले आहे. काही दिवसांपूर्वीच परदेशातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी या नाटकाने अमेरिकेलाही प्रयाण केले होते. पण अमेरिका दौऱ्यावर गेल्यावर या नाट्यचमूला वेगळ्याच बिकट परिस्थितीला तोंड दयावे लागले. जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाने अमेरिकेतही शिरकाव केल्याने तिथल्या अनेक शहरात होणाऱ्या या नाटकाच्या प्रयोगांना खीळ बसली. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सगळे प्रयोग रद्द करून मायदेशी परतण्याचा बिकट समस्येला त्यांना तोंड द्यावे लागले. खरंतर हा दौरा काही महिन्यांपूर्वीच ठरला होता. पण हतबल होऊन त्यांना सॅन फ्रान्सिस्को शहरात अडकून पडावे लागले. तेथून त्यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरात आल्यावर सुमारे १२ तास ताटकळत राहावं लागलं, विमानं रद्द झाली होती. अशा नाना अडचणीतून मार्ग काढत त्यांना मुंबई गाठावी लागली. प्रमुख कलावंत श्री . अमेय वाघ यांनी यावर बोलतानां म्हटले की, ते अमेरिकेत असताना येथील शासनातर्फे त्यांची चांगली काळजी घेतली गेलीच, पण तिथले त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी देखील चांगले सहकार्य केले. इथे मुंबईत आल्यावरही विमानतळावरील कर्मचारीवर्ग, डॉक्टर्स जे तरुण व उत्साही होते, अतिशय मेहनतपूर्वक व निष्ठेने आपली कामे पार पाडत आहेत त्यांचे त्यांनी खूप खूप आभार मानले व कौतुक केले. हातावर त्या सर्वांना क्वारंटाईन्ड स्टॅम्प्स मारले आहेत. त्यामुळे निदान पंधरा दिवस त्यांना कुणाच्याही संपर्कात जात येणार नाहीय व ज्यांना असे स्टॅम्प मारले आहेत त्यांनीही इतरत्र फिरू नये, असा सल्ला ते देत आहेत. अगदीच निकड असेल तर बाहेर जावं असं ते म्हणतात. हे सारे कलावंत आता सुखरूप परतलेत. या करोनाचा भस्मासूर शक्यतितक्या लवकर स्टुडिओ चे दणक्यात प्रयोग सुरु व्हावेत व पुन्हा त्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे करून परदेशस्थ रसिकांनाही आनंद देण्यासाठी सज्ज व्हावे हि इच्छा !
[Photo via Facebook]