झपूर्झा हा अजेय संस्थेचा वार्षिक इव्हेंट. स्पर्धात्मक वातावरणाच्या बाहेर नव्या कलाकारांना सादरीकरण करता यावं, त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा हा या मागचा हेतू. दरवर्षी झपूर्झामध्ये जास्तीत जास्त नवे कलाकार सहभागी होतात. अभिनय, ध्वनीसंयोजन, प्रकाशयोजना, नेपथ्य, व्यवस्थापन अश्या विभागात ही रस असणारे तरुण कलाकार सहभागी होऊ शकतात. आजही म्हणजेच झपूर्झा च्या १०व्या वर्षात ही उद्देश कायम आहे. गेल्या नऊ वर्षात झपूर्झा ही अतिशय महत्त्वाची नाट्य चळवळ म्हणून नावारूपाला आली आहे.
संपूर्ण झपूर्झा एकाच थीमवर आधारित असतो. नाट्याविष्कार, नृत्यनाट्य, नृत्याविष्कार यातून त्याच विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समोर मांडल्या जातात. झपूर्झाची संकल्पना लेखक, दिग्दर्शन डॉ. क्षितिज कुलकर्णी यांची असून निर्माता गौरव संभूस आहेत. तसेच, अजेयची संपूर्ण टीम झपूर्झातल्या वेगवेगळ्या विभागात सहभागी असते.
झपूर्झामध्ये आजवर सादर झालेल्या थीम
१. झपूर्झा : एक आधुनिक वेडोत्सव
२. झपूर्झा : समाजा कडून समाजासाठी.
३. झपूर्झा : इंडियातील यंग भारत
४. झपूर्झा : रंग अजून ओला आहे.
५. झपूर्झा : प्रेम कर भिल्ला सारख
६. झपूर्झा :डोळ्याने पाहीन रूप तुझे
७. झपूर्झा : पडद्यावरील नाटक
८. झपूर्झा : वसूधैव कुटुंबकम
९. झपूर्झा : हसले मनी चांदणे
१०.झपूर्झा : तेजस्वी दशक महोत्सव (लवकरच)
अश्या संपूर्ण वेगळ्या आणि नव्या थीम वर आधारित झपूर्झा सादर झाला आहे. झपूर्झाची प्रक्रिया एक ते दोन महिन्यांची असते.
झपूर्झा हा ठाण्यात गडकरी रंगायतन मध्ये अनेक वर्षे सादर होत आला आहे. तसेच डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातही २०१४ साली पार पडला. कालांतराने झपूर्झाचे रूपांतर चळवळीमध्ये झाले त्याचे स्वरूप बदलत गेले.
शब्दझपूर्झा अंक
झपूर्झामधलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘शब्दझपूर्झा’ अंक. २०१३ पासून प्रत्येक वर्षी झपूर्झाचा अंक निघत आहे तो सुद्धा झपूर्झाच्या थीमवर. ह्या अंकात अजेय संस्थेतील, अजेय संचालित शतकोटी रसिक समूहावरील, आणि इतर सर्व इच्छुक लेखकांना, कवींना लिहिण्याची संधी उपलब्ध असते. यंदाच्या दशक महोत्सवानिमित्त ‘शब्दझपुर्झा’ वाचकांच्या भेटीस येणार आहे.
काव्ययोग — झपूर्झाचा पहिला टप्पा
झपूर्झाचा पहिला टप्पा ‘काव्ययोग‘ सुरू झाला आहे. ‘काव्ययोग’ कार्यक्रमाने झपूर्झाची नांदी होत आहे. अजेय संस्थेच्या ‘शतकोटी’ समूहावरील कवींमधून कविवर्य म.पां. भावे स्मृती पुरस्कार २०२२ देण्यास आरंभ होत आहे. यामध्ये ३४ कवींनी सहभाग घेऊन मोठया प्रमाणावर सहभाग नोंदवला आणि महिनाभर काव्यहोत्र सुरू होतं. यामध्ये निवडक १० कवींचे सादरीकरण व गौरव दशकातील १० विशेष मराठी कवींच्या शैलीचा १० निवेदकांकडून रसास्वाद, ३४ कवींपैकी निवडलेल्या १० कवींपैकी एकाला म.पां.भावे पुरस्कार देऊन गौरव असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. काव्ययोगाचे परीक्षण ज्येष्ठ कवी विकास भावे यांच्या हस्ते होणार आहे. रविवार ३ जुलै २०२२ रोजी, दुपारी ३ वाजल्यापासून मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड, ठाणे(प.) येथे काव्ययोगाचा आस्वाद घेऊ शकता.
झपूर्झामध्ये सहभागी होण्यासाठी कलाकारांना आवाहन
तसेच झपूर्झामध्ये नवोदित कलाकारांना सहभागी होण्यासाठी मोठयाप्रमावणार संधी मिळणार आहे, त्यासाठी वयोगट १६ ते २६ असून या मध्ये अभिनेते, अभिनेत्री, तसेच नृत्यकलाकारांची आवश्यकता आहे. ज्यांना ऑडिशन द्यायची इच्छा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.
झपूर्झा फेसबूक पेज लिंक – http://Fb.me/zapurza2022
संपर्क — ८९२८८ ६४१७१, ७२०८६ ८८२३५