आजच्या काळात अभिनयाचे तांत्रिक शिक्षण घेऊनच सिने-नाट्यसृष्टीत पदार्पण करण्याचा मानस बरेच तरुण व्यक्त करताना दिसतात. अशा तरुण पिढीच्या अभिनयकौशल्याला वाव मिळावा म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल आणि अभिनय, कल्याण या संस्था एकत्रितपणे आपल्यासाठी घेऊन येत आहेत ‘अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम‘!
Abhinay Pramanpatra Abhyaskram
अभिनय, कल्याण गेली २२ वर्षे मराठी रंगभूमीवर सातत्याने नव-नवीन प्रयोग सादर करीत आली आहे. नाट्यविषयक उपक्रम राबवत आली आहे. भारतभर संस्थेने स्वत:चा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. संस्थेच्या वाटचालीत आता नवा टप्पा सुरू होतोय. अभिनय, कल्याण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत झुंजारराव यांनी आमच्या टीमशी बोलताना सांगितले की, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल आणि अभिनय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम कल्याण येथे सुरू करीत आहोत. नाटकाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन यात केले जाणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण अभ्यासक्रम विकसित केला गेला आहे. सगळ्यांनाच मुंबई पुण्यात जाऊन नाटकाचे शास्त्रीय शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थी मित्रांना या संधीचा नक्कीच लाभ घेता येईल.”
२८ जानेवारी पासून या कार्यशाळेला कल्याण येथे सुरुवात होणार आहे. आठवड्यातील दर शुक्रवार ते रविवार, संध्याकाळी ६ ते ९ हि कार्यशाळा राबवली जाईल. अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी सलग सहा महिन्यांचा असणार आहे. प्रवेश घेणाऱ्या सदस्यांची शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक आहे. १ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. पहिल्या २५ विद्यार्थ्यांनाच या कार्यक्रमात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे, त्वरा करा!
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
९९६७०८५५०५, ८१६९५१७११२