काही दिवसांपूर्वी आम्ही अभिनय, कल्याण आयोजित ‘अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या उपक्रमाबद्दल तुम्हाला माहिती दिली होती. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण अभ्यासक्रम विकसित केला गेला होता. तुम्हाला अद्याप या अभ्यासक्रमाबद्दल माहिती नसेल तर पुढील लिंकला नक्की भेट द्या. कारण, लवकरच अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा द्वितीय वर्ग सुरू होणार आहे.
अभिनय, कल्याण आयोजित अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम — अभिनयाचे शास्त्रीय शिक्षण
खुशखबर अशी की या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गात तयार झालेल्या कलाकारांचं जगदीश पवार लिखित आणि अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘साम्राज्यम्’ हे नाटक लवकरच तुमच्या भेटीस येत आहे. अभिनय, कल्याण निर्मित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरूकुल प्रकाशित आणि केशव गोरे स्मारक आयोजित ‘साम्राज्यम्’ या नाटकाचा येत्या रविवारी १० जुलै, २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता, केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृह, गोरेगाव (प) येथे प्रयोग सादर होणार आहे.
स्वेच्छा देणगी मूल्य — १००/-
संपूर्ण पत्ता
केशव गोरे स्मारक ट्रस्ट सभागृह,
अंबाबाई देवस्थान जवळ,
आरे रोड, गोरेगाव (पश्चिम),
मुंबई – ४०००६२
‘साम्राज्यम्’ नाटकाबद्दल माहिती देताना नाटकाचे दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव सांगतात की, “साम्राज्यम् नाटक आजकालचे राजकारण, कौटुंबिक विवाद आणि त्यातून एका त्याच घरातील मोठ्या व्यक्तीचे किंवा सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचे खच्चीकरण स्पष्टपणे दाखवते. कोणी तरी कोणावर विश्वास ठेवलेला असतो आणि तो त्या विश्वासाचा तडा जाऊ देतो. म्हणून विश्वास ठेवण्याजोगी एकच गोष्ट आहे ती म्हणजे अविश्वास! जो ठायी ठायी आपल्याला आजच्या राजकारणातून पाहायला मिळतो. दिग्दर्शकाने हाच हेतू ठेवून बांधणी केली आहे की प्रत्येक भाषेतील प्रेक्षक हे नाटक त्यांच्या पद्धतीने पाहून घरी घेऊन जाऊ शकतील. यात भाषा नाही तर मांडणीतून प्रत्येक गोष्ट उलगडत जाते. आजकालच्या परिस्थितीत ज्याचा पक्ष चर्चेत त्याचा मी सेवेकरी. अश्याच गोष्टीला धरून सुरवातीला आपल्याला रावणाच्या लंकेत दास पाहायला मिळतो. जो मिळेल त्या मोहरात हवं ते सांगतो. म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल मान प्रतिष्ठा मिळवायची किंव्हा ऐकायची असेल, तर चार पैसे देऊन तुम्ही लोक विकत घेऊ शकता जे तुमच्याबद्दल बोलतील परंतु असा प्रकार खूप दिवस चालत नाही असा सेवेकरी/दास जास्त दिवस तुमच्याबद्दल बोलणार नाही. चिरकाल लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला वेगळी माणसं जोडावी लागतात जे तुमच्या खऱ्या कामावर आणि सत्याच्या प्रयोगावर बोलतील. असे लोकं तुम्हाला सत्ता बदलली तरी नोटांवर चिरकाल पाहायला मिळतात. मग लोक नाही तर पैसा स्वतः तुमचं गुणगान गातो. कालच पाऊस झाला मातीतील सुगंधाने अत्तराचा वास निघून गेला. म्हणूनच साम्राज्य हे वेळेनुसार मातीच्या वासासारखे बनले पाहिजे जे चिरकाल टिकेल.”
लेखन — जगदीश पवार
दिग्दर्शन नेपथ्य — अभिजित झुंजारराव
संगीत — आशुतोष वाघमारे
प्रकाश योजना — श्याम चव्हाण
वेषभूषा — तृप्ती झुंजारराव
संगीत संयोजन — ओमकार जाधव
सूत्रधार — रोशन मोरे
कलाकर — अभिनय, कल्याण अभिनय, कल्याण संचालित अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रथम वर्गाचे विद्यार्थी
तसेच, अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम द्वितीय वर्ग १ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९६७०८५५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अभिनय, कल्याण संस्थेतर्फे करण्यात आले आहे.