लॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक Online माध्यमातून प्रेक्षकांच्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातीलच एक अभिनव उपक्रम म्हणजे अभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या”!
“नाट्यछटा दिवाकरांच्या” बद्दल काही ठळक मुद्दे
- हा उपक्रम १५ ऑगस्ट, २०२० ते २९ ऑगस्ट, २०२० दरम्यान अभिनय कल्याण संस्थेच्या YouTube चॅनेलवर सादर होणार आहे. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. https://www.youtube.com/channel/UCRkOzRPXizr6qAkrBAYCn3Q
- रोज सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
- नाटक, सिनेमा आणि सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोचलेले २६ कलाकार २६ निवडक नाट्यछटा सादर करणार आहेत.
- हा संपूर्ण प्रयोग स्वेच्छा मूल्य निधीवर राबवला जाणार आहे. म्हणजेच, आपण आपल्या इच्छे नुसार (ओमकार जाधव) 08551844599 या नंबरवर Google Pay, PhonePe द्वारे अभिनय कल्याण संस्थेला आपले स्वेच्छा मूल्य पाठवू शकता.
उपक्रमाचे वेळापत्रक आणि २६ कलाकारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
१३ ऑगस्ट रोजी रंगभूमी.कॉम च्या YouTube चॅनेलवर अभिजीत झुंजारराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी गप्पा मारताना “नाट्यछटा दिवाकरांच्या” या उपक्रमाबद्दल, त्यांच्या टीमवर्कबद्दल आणि अभिनय कल्याण संस्थेच्या आगाऊ उपक्रमांबद्दल बरीच माहिती मिळाली. हा मुलाखतीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.
अभिनय कल्याण संस्थेने तमाम प्रेक्षक वर्गाला अतिशय नम्रपणे उपक्रमाची संपूर्ण माहिती देत या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. ते नक्की वाचा!
श्री. शंकर काशिनाथ गर्गे अर्थात दिवाकर.
शंकर काशिनाथ गर्गे हे दिवाकर या टोपणनावाने नाट्यछटा लिहित. ज्या नाट्य वर्तुळात सर्वश्रुत आहेत. दिवाकरांचे वाचन अफाट होते. वाचना विषयी सन ३१ डिसेंबर १९१० साली त्यांच्या रोजनिशीत पुढील शेरा आढळतो. ‘यंदा वाचन चांगलेच झाले. एकूण १७७५२ पृष्ठे वाचली.’ यावरुन आपल्याला त्यांच्या विपुल वाचन संपदेचा विस्तृत अंदाज येतो. या वाचलेल्या व अभ्यासलेल्या पुस्तकांच्या यादीत शेक्सपिअर, स्कॉट, मेरी कॉरेली, कॉनंडाईल, डेन्री वुड, डिक्वेन्सी, टेनिसन, वुइलकॉक्स, मोलीयर यांच सोबत कित्येक मराठी चरित्र, नाटकं आणि कादंबऱ्याही आहेत.
या सगळ्या लेखकांचा, केलेल्या वाचनाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते लिखाण करण्यास प्रवृत्त झाले. याचं प्रेरणेतून दिवाकर यांनी आपल्या लेखनाची सुरवात २७ मार्च १९११ रोजी ‘यॉर्कशायर ट्रेजिडी’ या इंग्रजी नाटकावरून बेतलेल्या ‘रगेल रंगराव’ या नाटकाने केली. लेखनाचा सुरळीत प्रवास सुरु असताना त्यांची दृष्टी कमकुवत झाली. काम करण्यास ‘अनफिट’ असल्याचे पत्र त्यांना कचेरीतून मिळाले. त्यांची नोकरी गेली. पण ते थांबले नाहीत. याही परिस्थितीत ‘ब्राउनिंग’ या कवीच्या काव्य लेखना वरून त्यांनी काही मोनोलॉग्ज लिहिले. ते मोनोलॉग्ज वृत्तपत्राच्या पदाधीकाऱ्यांना वाचून दाखवले. वाचता क्षणीच ते आवडले आणि दिनांक १५ मार्च १९१३ साली हे मोनोलॉग्ज अर्थात दिवाकरांच्या नाट्यछटा केसरी सारख्या महत्वाच्या वृत्तपत्रातून घरा घरात पोचल्या. या नाट्यछटा इतका काळ लोटूनही कलाकारांना कराव्याशा वाटतात. आजही त्यावर प्रयोग होतात. हेच दिवाकरांच यश आहे. पुढे “दिवाकरांच्या नाट्यछटा” या नावाने सगळ्या नाट्यछटा पुस्तक रुपात संपादित सुद्धा झाल्या.
दिवाकरांच्या नाट्यछटांच महत्व जाणून आम्ही त्या आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा घाट घातला आहे. आम्ही निवडलेले २६ कलाकार २६ निवडक नाट्यछटा आपल्या समोर डिजिटल माध्यमातून सादर करणार आहोत. ज्या आम्ही स्वातंत्र्यदिनाच औचित्य साधून दिनांक १५ ऑगस्ट २०२० ते दिनांक २९ ऑगस्ट २०२० दरम्यान https://www.youtube.com/c/Abhinaykalyan या you tube channel वर रोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करणार आहोत. निवडलेले हे २६ कलाकार नाटक, सिनेमा आणि सिरीयलच्या माध्यमातून घराघरात पोचलेले आपले लाडके कलाकार आहेत. ज्यांनी खऱ्या अर्थी lock down चा हा कठीण काळ सुसह्य केला. या मातब्बर कलाकारां करता आणि आपल्या सारख्या रंगभूमी आणि कलाकारांवर मनापासून प्रेम करणाऱ्या दर्दी रसिक प्रेक्षकां करता नव्या जुन्याचा हा अनोखा संगम निश्चितच कुतूहलाचा विषय असेल. या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच माफक अपेक्षा.
हा संपूर्ण प्रयोग स्वेच्छा मूल्य निधीवर राबवला जाणार आहे. म्हणजेच, आपण आपल्या इच्छे नुसार (ओमकार जाधव) 08551844599 या नंबरवर Google Pay, PhonePe द्वारे आम्हाला आपले स्वेच्छा मूल्य पाठवू शकता.
आपली,
अभिनय, कल्याण.
०९९६७०८५५०५
अशाच नवनवीन उपक्रमांबद्दल रंगभूमी.com तुम्हाला नेहमी माहिती देत राहील. त्यामुळेच आम्हाला रंगभूमी.com ला Like, Follow आणि Subscribe करायला विसरू नका.