मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जावे असे एक नाव म्हणजे थोर गायक नट नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व. आज २६ जून रोजी बालगंधर्व यांची आज १३३ वी जयंती. बालगंधर्व यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयातून रंगभूमीला अजरामर संगीत नाटकांचा साज चढविला. त्यांच्या इतका चोख स्त्रीभूमिका वठविणारा कलाकार सापडणे कठीणच. अशा या ज्येष्ठ रंगकर्मीच्या जयंतीचे औचित्य साधून ‘अभिजात’ नामक संस्थेने ‘बालगंधर्व स्वराभिनाट्य’ नावाचा एक अनोखा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या कार्यक्रमात बालगंधर्वांच्या जीवनावरील नाटकांचे पदांसहित अभिवाचन होणार आहे.
‘बालगंधर्व स्वराभिनाट्य’ हा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून प्रेक्षकांना बघता येणार आहे. सुमारे अडीच तासांचा हा रसभरीत कार्यक्रम प्रेक्षक ३० जूनपर्यंत कधीही तिकीट काढून बघू शकतात.
पुढील लिंकवर तुम्हाला तिकीट बुक करता येईल.
(Under ‘rent show‘ section)
Direct Booking link: https://www.ticketkhidakee.com/balgandharva
कार्यक्रमाच्या बुकिंगसंबंधी काहीही शंका अथवा अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा: +91 8275442370
तिकीट दर पुढीलप्रमाणे असतील:
(Prizes as per respective currencies)
India : 200.00
Hong Kong/China: 30.00
USA/Canada: 5.00
UAE: 19.00
UK: 4.00
Other Countries: Rupees 400
त्वरा करा! अभिजात नटाच्या अभिजात स्वराभिनाट्याचे साक्षीदार होण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका. आजच तिकीट बुक करा आणि या नाट्यसंगीतमय मैफिलीचा भाग व्हा!