Update:
६३ वी महारष्ट राज्य नाट्य स्पर्धा, म्हणजेच २०२४-२०२५ मध्ये होणारी हौशी व बालनाट्य स्पर्धा याची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
१९६१ पासून महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये नवनवीन संशोधन करण्यासाठी नाट्य, नृत्य, संगीत, लोककला, साहित्य व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. २०२३ हे वर्ष, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६२ वे वर्ष आहे.
हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२०२४ स्पर्धेची नवीन नियमावली पुढीलप्रमाणे आहे.
राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली व माहिती (Rajya Natya Spardha – Rules & Regulations)
६२ वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा प्रवेश अर्ज यावर्षी ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारल्या जाणार आहेत. पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
६२ वी राज्य नाट्य स्पर्धा – प्रवेश अर्ज (Rajya Natya Spardha Entry Form)
६२ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२३-२०२३ – माहिती व नियमावली (Rajya Natya Spardha Details)
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. २० नोव्हेंबर, २०२३ रोजी सुरू होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक २० ऑगस्ट, २०२३ ते १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत.
६२ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २० नोव्हेंबर २०२३ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध १९ केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे.
महत्वाच्या सूचना:
१. १५ सप्टेंबर २०२३ नंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
२. प्रवेशिकेसोबत आवश्यक कागदपत्रे न जोडल्यास अथवा संपूर्ण तपशील न भरल्यास ऑनलाइन प्रवेशिका भरता येणार नाही.
३. शासनाने निश्चित केलेल्या केंदावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही तर संस्थेने प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा होईल.
राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभाही व्हावे असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
६२ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२३-२०२४ – प्रवेश अर्ज (Rajya Natya Spardha Entry Form)
स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी www.mahanatyaspardha.com या वेबसाईटला भेट देऊ शकता. नियमावली येथे क्लिक करून डाउनलोड करा.
राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली
राज्य नाट्य स्पर्धेच्या पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी रंगभूमी.com ला Subscribe करा.
दरवर्षी हौशी रंगकर्मींसाठी पर्वणी ठरणारी आणि त्यांना स्वतःचे अभिनयकौशल्य दाखवून देण्याची संधी देणारी *ही स्पर्धा* या वर्षीही खूप रंगेल याबाबत शंका नाही.
2 Comments
मला नाट्य खूप आवडते मला काही स्पर्धेत भाग घ्यायला ही खूप आवडते
spardha online bhaya gayal advedl