महाराष्ट्र शासन गेली कित्येक वर्षे, राज्यातील सर्व कलांचे संवर्धन व विविध कलांना प्रोत्साहन आणि कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. याकरिता, महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरांवर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्यांतील सर्वांत उत्तम उपक्रम म्हणून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेकडे सर्वांचे पाहिले लक्ष जाते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्रात अनेक (सुमारे २०) केंद्रे असतात. २०२३ हे वर्ष, महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे ६२ वे वर्ष होते. तसेच महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे २० वे वर्ष होते.
या ६२ व्या महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी, दिनांक २० नोव्हेंबर २०२३ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध २० केंद्रांवर पार पाडण्यात आली होती. या केंद्रांमध्ये, मुंबई १, मुंबई २, मुंबई ३, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, गोवा, नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती अशा जिल्ह्यांचा समावेश होता. या केंद्रांवरची प्राथमिक फेरी पार पडून काही दिवसातच त्यांचा निकालही लागला होता; मात्र या स्पर्धेचे विभागीय पारितोषिक समारंभ कधी होणार याची सर्वच कलाकारांना उत्सुकता लागली होती. काही दिसांपूर्वीच या विभागीय पारितोषिक समारंभाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तरी “कोणत्या केंद्राचे पारितोषिक वितरण समारंभ कोणत्या विभागात होणार ?” असा देखील सर्वांना प्रश्न पडला होता. मात्र रंगभूमी.com सर्व विजेत्यांसाठी त्यांच्या या प्रश्नाचे सविस्तर व समाधानी उत्तर घेऊन आले आहे.
62nd Rajya Natya Spardha 2024 Result – Awards Ceremony
राज्य नाट्य स्पर्धा — विभागीय पारितोषिक वितरण समारंभ वेळापत्रक
६२ वी महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा व २० वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, विभागीय पारितोषिक वितरण समारंभ २०२३-२४ वेळापत्रक खालीलप्रमाणे:
विभाग मुंबई
दिनांक – २३ जुलै २०२४
वेळ – सायंकाळी ६.३०
ठिकाण – यशवंत नाट्य मंदिर, मुंबई
हौशी मराठी केंद्र :
मुंबई १, मुंबई २, मुंबई ३, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, गोवा.
बालनाट्य केंद्र :
मुंबई, नवी मुंबई.
विभाग पुणे
दिनांक – २३ जुलै २०२४
वेळ – सायंकाळी ६.३०
ठिकाण – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी, पुणे
हौशी मराठी केंद्र :
पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
बालनाट्य केंद्र :
पुणे, कोल्हापूर, सोलापूर.
विभाग नाशिक
दिनांक – २३ जुलै २०२४
वेळ – सायंकाळी ६.३०
ठिकाण – महाकवी कालिदास नाट्यगृह, नाशिक
हौशी मराठी केंद्र :
नाशिक, जळगाव, अहमदनगर.
बालनाट्य केंद्र :
नाशिक, जळगाव.
विभाग औरंगाबाद
दिनांक – २३ जुलै २०२४
वेळ – सायंकाळी ६.३०
ठिकाण – तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
हौशी मराठी केंद्र :
औरंगाबाद, नांदेड.
बालनाट्य केंद्र :
औरंगाबाद.
विभाग नागपूर
दिनांक – २३ जुलै २०२४
वेळ – सायंकाळी ६.३०
ठिकाण – डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
हौशी मराठी केंद्र :
नागपूर, चंद्रपूर, अमरावती.
बालनाट्य केंद्र :
नागपूर, अमरावती.
आगामी महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या हालचाली सुरू असताना, मागच्या वर्षीचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ होत असून, कलाकारांच्या मनात दुहेरी आनंद दिसू लागतोय.