Update: ६२ वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा — हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२३-२०२४
महाराष्ट्र सरकार १९६१ पासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६१ वे वर्ष आहे. नवीन वर्ष निमित्ताने नवीन नियमावली स्पर्धेसाठी तयार करण्यात आली आहे.
राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली व प्रवेश अर्ज
६१ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२३ – माहिती व नियमावली (Rajya Natya Spardha Details)
दरवर्षी अनेक नाट्य संस्था राज्य नाट्य स्पर्धेची वाट पाहत असतात. कोरोना काळातही या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी राज्य नाट्य स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत हौशी कलाकार या स्पर्धेमार्फत आपली कला सादर करतात.
६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धाची अंतिम फेरी १ जानेवारी २०२३ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची स्पर्धेची प्राथमिक फेरी १ जानेवारी २०२३ पासून १० केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. खुल्या गटांना ३०००/- तर बालनाट्य गटासाठी १०००/- प्रवेशिका फी आकारण्यात आली आहे. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२२ आहे.
प्रवेशिका पुढीलप्रमाणे सादर करू शकता
— मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्था, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२ (०२२-२२०४३५५०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर करू शकतात.
— पुणे महसूल विभागातील संस्था, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक- ४, विमानतळ रोड, पुणे (७८७५१५९९६६) या पत्त्यावर प्रवेशिका सादर करू शकतात
— औरंगाबाद महसूल विभागातील संस्था सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर ०२, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औरंगाबाद-४३१००५ (०८७८८८९३५९०) या पत्त्यावर प्रवेशिका सादर करू शकतात
− नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्था सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय द्वारा अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर ४४०००१ (०७१२-२५५४२११) या पत्त्यावर प्रवेशिका सादर करू शकतात.
राज्य नाट्य स्पर्धा २०२३ – प्रवेश अर्ज (Rajya Natya Spardha Entry Form)
स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी www.mahasanskruti.org या वेबसाईटला भेट देऊ शकता. स्पर्धेचा प्रवेश अर्ज येथे क्लिक करून डाउनलोड करा.
राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली व प्रवेश अर्ज
राज्य नाट्य स्पर्धेच्या पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी रंगभूमी.com ला Subscribe करा.