सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य हौशी स्पर्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१ साली घेता आल्या नव्हत्या. यंदा मात्र स्पर्धेच्या हीरक महोत्सवी वर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा दणक्यात पार पडली. मराठी, हिंदी, संस्कृत तसेच बालनाट्य, संगीतनाट्य व दिव्यांग बालनाट्य अशा सहा वेगळ्या प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर या स्पर्धा घेण्यात आल्या.
हिंदी व मराठी भाषेतील नाट्य स्पर्धांचा निकाल जाहीर झालेला आहे व तो पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २०२२ — मराठी नाटकांचे निकाल
श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेच्या ‘इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.
साईकला कला क्रीडा मंच (पिंगुळी, कुडाळ) या संस्थेच्या ‘बाकी शून्य‘ या नाटकाला दुसरा तर कोल्हापूरच्या मेरिड (इंडिया) या संस्थेच्या ‘नेटवर्क २४ बाय ७‘ या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
परीक्षक म्हणून विश्वास मेहेंदळे, श्रीमती स्वरुप खोपकर, अविनाश कोल्हे, डॉ. सतीश साळुंखे आणि संजय भाकरे यांनी काम पाहिले.
हौशी मराठी स्पर्धेतील इतर विजेते पुढीलप्रमाणे आहेत:
- दिग्दर्शन: डॉ. सोमनाथ सोनवलकर (इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल), केदार देसाई (बाकी शून्य), विद्यासागर अध्यापक (नेटवर्क २४ बाय ७)
- नेपथ्य: डॉ. अरुण मिरजकर (थेंब थेंब आभाळ), चंदन दळवी (बाकी शून्य), संतोष कदम (आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ)
- प्रकाश योजना: श्याम चव्हाण (इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल), श्याम चव्हाण (बाकी शून्य), आशिष भागवत (नेटवर्क २४ बाय ७)
- रंगभूषा: गणेश मांडवे (इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल), दास कवळेकर (सौ.), सिध्दी मारणे (विषाद)
- संगीत दिग्दर्शन: अमित साळोखे (अंधायुग), कृष्णा (आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ), परेश पेठे (थेंब थेंब आभाळ)
मराठी नाटकं − अभिनयाची पारितोषिके
उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक)
- पुरुष कलाकार: सलीम शेख (थलाई कुथल), नीलेश गोपनारायण (नात्याची गोष्ट), डॉ. सोमनाथ सोनवलकर (इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल), श्रीराम जोग (डहूळ), केदार देसाई (बाकी शून्य), अजय इंगवले (अंधायुग), दिलीप काळे (आला रे राजा), नीलेश राजगुरु (आला रे राजा ) राजन जोशी (नेटवर्क २४ बाय ७), प्रशांत निगडे (आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ).
- स्त्री कलाकार: उन्नती कांबळे (खानदानी), श्वेता कुडाळकर (बाकी शून्य), प्रियंका दाभाडे- गजभिये (ॲनेक्स), विरीषा नाईक (आय एम पुंगळया शारुक्या आगीमहुळ), रेवती शिंदे (ज्याचा त्याचा प्रश्न), सायली रौंधळ (विषाद), केतकी कुंभारे (शिंदळ), मिनाक्षी बोरकर (थलाई कुथल), अश्विनी खाडीलकर (थेंब थेंब आभाळ), श्रृती देसाई जांभळे (सौ.).
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे
- स्त्री कलाकार: गायत्री तरसरे (टेक अ चान्स ), कल्पना जोशी (डोंगरार्थ ), प्रगती शिंदे (शट अप ब्रुनो ), शुभांगी चव्हाण (मुव्ह ऑन मीरा), सुजाता डांगे (हार्मनी बिटवीन मिस्टर ॲन्ड मिसेस परस्पर).
- पुरुष कलाकार: दीपक शर्मा (ज्याचा त्याचा प्रश्न), महेश गावडे (विषाद), विनय कांबळे (इन द सेल ऑफ सर्व्हायव्हल), ओंकार प्रदीप पाटील (लिअरने जगावं की मरावं), आदित्य जांभळे (सौ).
अंतिम फेरीत एकूण ३४ नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेच्या अंतिम फेरीचा इतिहास पाहता प्रेक्षकांचा सर्वाधिक सहभाग कोल्हापूर केंद्रावर मिळाला, असे श्री. किरणसिंह चव्हाण, स्पर्धा समन्वयक यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यभरातील आशयघन नाटकांची पर्वणी मिळाल्याने स्थानिक नवोदित कलाकारांसाठी ही एक कार्यशाळाच ठरली असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २०२२ — हिंदी नाटकांचे निकाल
मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, वाशी, नवी मुंबई या संस्थेच्या ‘मोक्षदाह‘ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.
१७ एप्रिल ते २४ मे या कालावधीत भरत नाट्य मंदिर – पुणे, साहित्य संघ – गिरगांव आणि सायंटिफिक सभागृह, नागपूर येथे आयोजित झालेल्या या स्पर्धेत एकूण ४६ नाट्यप्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी श्री. वासुदेव विष्णूपूरीकर, श्री. नरेंद्र आमले आणि श्रीमती प्रियंका ठाकूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या स्पर्धेतील इतर विजेते पुढीलप्रमाणे आहेत:
सर्व विजेत्या नाट्यसंस्थांचे हार्दिक अभिनंदन! आम्ही आशा व्यक्त करतो की सर्व विजेत्या संस्था लवकरच आपापल्या नाट्यकृतींचे सादरीकरण करण्यासाठी सज्ज होतील. जेणेकरून, रसिक प्रेक्षकांना या विविध नाट्यछटांचा आस्वाद घेता येईल.
Related Links:
- ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशाला सुरुवात — नियम, प्रवेशिका आणि माहिती येथे वाचा! [Updated]
- कोल्हापूरात रंगणार हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी!
2 Comments
Pingback: राज्य नाट्य स्पर्धा २०२२ − नियम, प्रवेशिका व माहिती येथे मिळेल
Pingback: राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरात • रंगभूमी.com