सर्वप्रथम नाट्यरसिक of the Month स्पर्धेला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद! नाट्यरसिक of the Month स्पर्धेमध्ये आम्ही नाटकाशी संबंधित काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन तुम्हाला नाटकांबद्दल असलेली ओढ तुम्ही सिद्ध केलीय. म्हणूनच या महिन्यात आम्ही तुमच्या भेटीला एक नवीन स्पर्धा घेऊन आलो आहोत. या स्पर्धेचं नाव आहे नटसम्राट/नटसम्राज्ञी of the Month. नावावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही स्पर्धा अभिनयाशी संबंधित असणार आहे. परंतु याही पलीकडे या स्पर्धेमागचा मुख्य हेतू असणार आहे तो म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगभूमी स्थगित झालेली असताना रसिक प्रेक्षकांना नाट्यसृष्टीशी बांधून ठेवण्याचा!
मंडळी! आपण बरीच नाटकं बघत असतो. काही नाटकं, त्यांची पुस्तकं आपण आपल्याजवळ बरीच वर्षे संग्रहित करून ठेवलेली असतात. याच आवडत्या नाटकांमधील तुमचा आवडता उतारा पाठ करून त्याच्या सादरीकरणाचा विडिओ तुम्हाला लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचाय.
अभिनयाचा व्हिडिओ पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा!
- सादरीकरणासाठी उतारा: स्पर्धेसाठी नाटक, एकांकिका अथवा स्वरचित लिखाणावरील सादरीकरण चालेल.
मराठी नाटक Online या लिंकला भेट देऊनही तुम्हाला बरीच नाटकं मिळतील. तुम्ही YouTube वरील नाटकांचीही मदत घेऊ शकता. - Instagram IGTV: आम्ही तुमचे व्हिडिओज रंगभूमी.com च्या instagram अकाऊंटच्या IGTV चॅनेलवर upload करू.
- Total Likes: तुम्हाला तुमच्या विडिओ वर जास्तीत जास्त Likes मिळवायचे आहेत.
- First come, first served: ज्या क्रमाने स्पर्धक आमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवतील त्या क्रमानेच ते IGTV वर upload होतील. ही प्रक्रिया आजपासून ३१ जुलैपर्यंत सुरू राहील. त्यामुळे जितका लवकर व्हिडिओ आमच्याकडे पाठवाल तेवढी जास्त views आणि likes मिळवण्याची मुदत तुम्हाला मिळेल.
- निकाल: ३१ जुलैला रात्री १२ वाजेपर्यंत आलेले एकूण views आणि likes या स्पर्धेचा विजेता ठरवतील. निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल.
- वयोमर्यादा: स्पर्धेसाठी वयोमर्यादा नाही.
- वेळमर्यादा: व्हिडिओची वेळमर्यादा २ मिनिटांपेक्षा कमी नसावी. कमीत कमी २ ते जास्तीत जास्त १० मिनिटांचा विडिओ ग्राह्य धरला जाईल.
- एकपात्री अभिनय स्पर्धा नाही: ही एकपात्री अभिनय स्पर्धा नाही. त्यामुळे सादरीकरण एकपात्री असणे बंधनकारक नाही. एकपात्री, दोनपात्री किंवा बहुपात्री सादरीकरणही चालेल. म्हणजेच एकाच घरात नवरा-बायको, भाऊ-बहीण किंवा संपूर्ण कुटुंबही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
- परीक्षक: रसिक प्रेक्षकच या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत. आवडत्या स्पर्धकाला भरभरून प्रेम देऊन रसिक प्रेक्षकच विजेता ठरवतील.
- IGTV लिंक बंधनकारक: स्पर्धकांनी रंगभूमी.com वरील IGTV व्हिडिओच्या लिंकचाच प्रचार करावा. तसंच, आम्ही IGTV वर तुमचा विडिओ अपलोड करू तेव्हा स्पर्धकाचे username त्यामध्ये tag करण्यात येईल. त्यामुळे, विडिओ अपलोड झाल्यावर username तपासून बघा.
लक्षात ठेवा! ३१ जुलैला रात्री १२ वाजेपर्यंत आलेले एकूण likes या स्पर्धेचा विजेता ठरवतील. स्पर्धेचा विजेता एकच असेल. मुलगा असेल तर नटसम्राट आणि मुलगी असेल तर नटसम्राज्ञी of the Month. त्यामुळे जराही वेळ न दवडता लवकरात लवकर तयारी सुरू करा आणि तुमचे व्हिडिओज आमच्यापर्यंत पोहोचवा. पुढे दिलेला फॉर्म भरून तुम्ही तुमचा विडिओ आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.