साहित्याच्या खजिन्यात थोडंसं जरी डोकावून बघितलं तरी ते साधकाला भरभरूनच देतं आणि हे गणित ज्याला गवसलं तो या खजिन्याचा स्वत:ला समृद्ध करण्यासाठी सुयोग्य वापर करून घेतो. असंच काहीसं घडलंय हौशी कलाकार श्री. अनिरुद्ध पाटील यांच्याबरोबर! म्हणूनच की काय त्यांनी कुटुंबिय आणि मित्रांबरोबर हा Online साहित्य मेळावा भरवण्याचे ठरविले आहे. श्री. अनिरुद्ध पाटील यांनी हौशी रंगभूमीवर बऱ्याच नाटकात काम केले आहे. त्यांनी ठरविलेला हा ३ दिवसांचा कार्यक्रम Instagram वर सादर होणार आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे.
१५ मे, २०२० – कथावाचन । “प्रकृती” – मधू तथा एम्. पी. पाटील
१६ मे, २०२० – काव्यवाचन । कवी – कुसुमाग्रज, पु. शि. रेगे, नीरजा, दीपक कुमार, संदीप माने, विजया पाटील
१७ मे, २०२० – एकांकिका वाचन । “कृष्ण किनारा” – लेखक – उन्मेष वीरकर (मूळ कथा – अरुण ढेरे)
असा हा विविध कलाकृतींचा खुसखुशीत नजराणा तुमच्या भेटीस येत आहे Instagram वर! तसेच, हे सर्व कार्यक्रम तिन्ही दिवस सायंकाळी ४:३० वाजता Instagram वर Live सादर होणार आहेत. या तीन दिवसांच्या साहित्य मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हा कार्यक्रम नक्की पहा आणि आम्हाला अभिप्राय कळवायला विसरु नका.