नाटकाच्या शेवटी कथानकाला ट्विस्ट देत गूढ उकलणारी रहस्यमय नाटकं पसंत करणारा एक खास प्रेक्षकवर्ग आहे. अशा प्रेक्षकवर्गासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. श्वेता पेंडसे लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ’38, कृष्ण व्हिला’ ही एक रोमांचक नाट्यकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
१९ मार्च रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकात गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे कलाकार असणार आहेत. इतर कलाकारांबद्दल अद्याप उलगडा करण्यात आलेला नाही.
जाणून घ्या काय आहे डॉ. गिरीश ओक यांचे बहारदार चिवित्रांगण!
कथानकाबद्दल थोडंसं…
‘38 कृष्ण व्हिला‘ नाटकामध्ये गिरीश ओक ‘देवदत्त कामत’ या भूमिकेत आपल्यासमोर येणार आहेत. देवदत्त कामत यांच्यावर नंदिनी चित्रे ही एक अज्ञात महिला गंभीर आरोप करते आणि देवदत्तसमोर एक नवीन आव्हान उभे राहते. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे! ’38, कृष्णा व्हिला’ ही एक अतिशय वेगळी केस आपल्यासमोर येणार आहे. आरोपांची मालिका आणि शेवटी उघडकीस येणारं धक्कादायक तथ्य! ही संक्षिप्त माहिती नक्कीच नाटकाबद्दलची उत्सुकता वाढवणारी आहे. या उत्सुकतेत भर पडणारी गोष्ट म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शक असणार आहेत रहस्यमय नाटकांचे सम्राट विजय केंकरे! त्यांच्या ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचं वर्णन करावं तितकं कमीच!
‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
लॉकडाऊननंतर प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या गिरीश ओक यांची ही गूढ केस सॉल्व्ह करायला प्रेक्षक १००% साथ देतील यात काही शंकाच नाही!