Update:
३४ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. हे निकाल आपण येथे बघू शकता.
३४ व्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत घसघशीत यशाचं ‘अस्तित्व’ उमटलं !!!
व्यावसायिक नाट्य संस्थांना उत्तेजन देऊन मराठी नाट्यकलेचा उत्कर्ष आणि विकासाला हातभार लावणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १९८६-८७ साली ‘मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा’ सुरू करण्यात आल्या.
दरवर्षी साधारणपणे २५ ते ३० व्यावसायिक नाट्य संस्थांचा या स्पर्धेत सहभाग असतो. डिसेंबर महिन्यात प्राथमिक फेरीसाठी प्रवेशिका मागविण्यात येतात. यातूनच, अंतिम फेरीसाठी नाट्यसंस्थांची निवड करण्यात येते.
यंदा ९ नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. माटुंगा स्थित यशवंत नाट्यमंदिर नाट्यगृहात २४ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान, ही अंतिम फेरी पार पाडणार आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीनेही ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, या अंतिम फेरीमध्ये जे प्रयोग सादर होणार आहेत त्यासाठी तिकीट दर फक्त ३०/- आणि ५०/- असे आकारण्यात आले आहेत.
अंतिम फेरीत जाहीर झालेल्या ‘जन्मवारी’, ‘गालिब’ किंवा ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकांचे प्रयोग सध्या सादर होत नाहीयेत. त्यामुळे, या नाटकांना भेट देण्यासाठी प्रेक्षकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
३४ वी महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा – वेळापत्रक
या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांना दर्जेदार नाटकं बघण्याची संधी मिळत आहे. ती दवडू नये. सर्व स्पर्धक संस्थांना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा!