अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्ब्बर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.श्री. शरद पवार व मुख्य निमंत्रक मा.ना.श्री. उदय सामंत आहेत, असे आज सुप्रसिद्ध अभिनेते व नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तंजावर येथे ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गज्वी व नाट्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज पूजन होणार आहे. यानंतर नाट्य संमेलनाच्या सोहळ्याची मुहूर्तमेढ कार्यक्रम सांगली येथे दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad – 100th Natya Sammelan Program
शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी पुणे येथे सुरु होऊन समारोप मे २०२४ अखेर रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.
Natya Parishad – 100th Natya Sammelan Location & Dates
- पुणे — ५ जानेवारी २०२४ (शुभारंभ)
- पिंपरी-चिंचवड — ६ व ७ जानेवारी २०२४ (नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा)
- अहमदनगर — २० आणि २१ जानेवारी २०२४
- सोलापूर — २७ आणि २८ जानेवारी २०२४
- बीड — ४ फेब्रुवारी २०२४
- लातूर — १० आणि ११ फेब्रुवारी २०२४
- नागपूर — १७ आणि १८ फेब्रुवारी २०२४
- मुंबई — तारखा अजून घोषित झाल्या नाहीत
Natya Parishad – 100th Natya Sammelan News
१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून आणि जास्तीत जास्त कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी नाट्य कलेचा जागर आयोजित करण्यात आला असून यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्य संगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार असून निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च २०२४ रोजी संपन्न होणार आहे. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या ९ एकांकिका आणि बालनाट्य तसेच नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल २०२४ यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
Natya Parishad – 100th Natya Sammelan Competition Prizes
एकांकिका आणि बालनाट्य स्पर्धा
प्राथमिक फेरी
• प्रथम पारितोषिक — ₹११,०००/-
• द्वितीय पारितोषिक — ₹७,०००/-
• तृतीय पारितोषिक — ₹५,०००/-
अंतिम फेरी
या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या आणि अंतिम फेरीत प्रथम आलेल्या एकांकिकेस ₹२,००,०००/- पारितोषिक देण्यात येणार आहे.
इतर एकांकिका
• प्रथम — ₹१,००,०००/-
• द्वितीय — ₹७५,०००/-
• तृतीय — ₹५०,०००/-
• उत्तेजनार्थ — ₹२५,०००/-
या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या खास ह्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या नवीन एकांकिकांमधून तीन एकांकिका सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पारितोषिकासाठी प्राथमिक फेरीतून निवडण्यात येतील. त्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येईल.
दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय
• प्रथम — ₹१५,०००/-
• द्वितीय — ₹१०,०००/-
• तृतीय — ₹५,०००/-
अंतिम फेरीत निवड झालेल्या नाट्य संगीत, एकपात्री, नाट्यछटातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रू. ५०,०००/- ,रू. ३५,०००/- , रू. २५,०००/-, आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी उत्तेजनार्थ रू. १०,०००/- देण्यात येणार आहेत.
अंतिम फेरीतील पहिल्या ३ विजेत्यांचे प्रयोग रत्नागिरी येथे होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात सादरीकरण होईल.
2 Comments
ह्या नाट्य संमेलनात संगीत नाटके कुठली आणि केव्हा सादर केली जाणार आहेत?
नाट्यसंमेलना तील नाटक, एकांकिका किवा इतर कोणत्याही कार्यक्रमास प्रवेशिका कुठे मिळेल आणि किती शुल्क लागेल.