- पार्थ थिएटर्स निर्मित, अर्चना थिएटर्स प्रस्तुत
मॅड सखाराम • मराठी नाटक
Comedy Natak
- लेखक: पु. ल. देशपांडे
- दिग्दर्शक: मंगेश सातपुते
- कलाकार: सुनील जाधव, श्रेयस वैद्य, विशाल मोर, अनुष्का बोऱ्हाडे, किरण राजपूत, प्राजक्ता पवार.
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- प्रकाश: अमोघ फडके
- संगीत: मंदार कमलापूरकर
- वेशभूषाकार: महेश शेरला
- निर्माते: सुनील-सुरेश
Online Ticket Booking
Natak Info
- Synopsis: सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक वादग्रस्त ठरले. सखाराम बाईंडर नाटकाला प्रखर विरोध झाला तेव्हा पु.ल. देशपांडे यांनी त्या वेळी (१९७४ ) मॅड सखारामच्या रूपात एक नाटय़ प्रतिसाद देण्याचे ठरवले जे त्याचे विनोदी प्रहसन किंवा विडंबन म्हणता येईल. मंगेश सातपुते दिग्दर्शित ‘मॅड सखाराम’ हे एक नवीन मराठी नाटक आहे. या नाटकचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोग झाले नव्हते. सुरेश जाधव, सुनील जाधव आणि मंगेश सातपुते यांच्या नेतृत्वाखालील या नाटकाच्या अनोख्या निर्मितीने नाट्यविश्वात एक नवीन चैतन्य संचारले आहे. या नाटकाने १८ डिसेंबर २०२३ रोजी रंगमंचावर पदार्पण केले आहे. ‘मॅड सखाराम’ हे एक विनोदी नाटक आहे.
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.
Related Artist Profiles
No results found.
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
Nusta Yedepana
हे नाटक का बघायला गेलो असं झालं होतं मला. पु.ल.यांनी सखाराम बाईंडरचं विडंबन लिहिलं होतं त्याच्यावर हे नाटक आधारित आहे. मुळात पु.ल.यांच्या कामाला हात लावण्याआधी १०० वेळा विचार करायला हवा. दुसरं म्हणजे एखादा लेख खरंच नाटकात रुपांतरीत होऊ शकतो का हे तपासायला हवा. दिग्दर्शकांनी दोन्ही केलं नाही. उलट मुळात संहितेत नसलेलं एक पात्र,कंसातले वाक्य बोलायला,म्हणून add केलं. हे म्हणजे ताजमहाल ला स्वतः च्या घरच्या विटा लावण्यासारखं झालं. मुख्य अभिनेत्याचा अभिनय इतका टुकार आणि ओढून ताणून केलेला वाटतो की डोक्यात सणक जाते. तुम्हाला कोणाचा सूड घ्यायचा असेल तर हे नाटक त्यांना बघायला सांगा. एका तासाने तो/ती व्यक्ति येऊन तुमच्या समोर लोटांगण घालून क्षमा मागेल.
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
You must be logged in to submit a review.