To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
- अस्मय थिएटर्स प्रकाशित, भूमिका थिएटर्स निर्मित
हौस माझी पुरवा • मराठी नाटक
Comedy Natak
- लेखक: संतोष पवार
- दिग्दर्शक: संतोष पवार
- कलाकार: अभिजीत केळकर, ऋचा मोडक, प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी आणि संतोष पवार
- प्रकाश: शितल तळपदे
- संगीत: रुपेश-नितीन
- निर्माते: अजय विचारे
Natak Info
- Synopsis: नाटकाची कथा आटपाट नगरात सुरू होते. या नगरामध्ये संत्या (संतोष पवार) आणि अभि (अभिजीत केळकर) हे दोन अवली मित्र राहत असतात. संत्या आणि अभिची जोडी म्हणजे राहू-केतूची जोडीचं जणू! आटपाट नगराची संपूर्ण सत्ता आपल्या हातात यावी यासाठी संत्या व अभि एक प्लॅन बनवतात. नगराच्या राजाला (अमोल सुर्यवंशी) सत्तेच्या खुर्चीवरून पाडण्यासाठी ते त्याच्याशी जवळीक साधून राजा व राणीला (प्राप्ती बने) चुकीचे सल्ले द्यायचा कट रचतात. जेणेकरून, सामान्य प्रजा त्याच्यावर चिडेल व त्याला सत्तेवरून हाकलून लावेल. एकदा प्रजेने राजाला हाकललं की आपल्यासाठी सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा होईल असा काहीसा संत्या आणि अभिचा विचार असतो. हे करण्यामध्ये त्यांची मैत्रीण सोनूही (ऋचा मोडक) त्यांना मदत करते. पण संत्या, अभि आणि सोनू त्यांच्या या प्लॅनमध्ये यशस्वी होतात का? ते खरंच राजा-राणीची दिशाभूल करतात का? ते करताना त्यांना कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर तुम्हाला ‘हौस माझी पुरवा‘ हे नाटक बघावंच लागेल.
Text Review
Video Review
नाटकाचे पुढील प्रयोग →
- There are no upcoming मराठी नाटकं.
Related Artist Profiles
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
There are no reviews yet. Be the first one to write one.