बदलत्या काळाबरोबर काही बदललं नसेल तर ती म्हणजे स्त्रियांची परिस्थिती! ह्याचे जिवंत दाखले रंगभूमीने प्रत्येक काळात नाट्यरूपाने आपल्या समोर आणले आहेत. अगदी पौराणिक काळातील द्रौपदीपासून आजच्या आधुनिक स्त्री पर्यंत स्त्रियांना फक्त आणि फक्त सोसावंच लागलं आहे हे दर्शवणारी कितीतरी नाटकं होऊन गेली आणि त्यांनी प्रेक्षकवर्गाला समाजातील भयाण परिस्थितीवर विचार करायला भाग पाडलं. आजही ती नाटकं बघितली की काळ बदलला असला तरी स्त्रियांची वेळ अजून बदललेली नाही हे ठळकपणे लक्षात येतं. स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडणारी अशीच काही सुप्रसिद्ध नाटकं तुमच्या भेटीला आणत आहोत!