मराठी रंगभूमीला लाभलेल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वांमध्ये अग्रस्थानी कोणतं नाव येत असेल तर ते म्हणजे “दिलीप प्रभावळकर”! मग ते त्यांचं लिखाण असो, अभिनय असो वा त्यांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा असोत ! वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन प्रत्येक भूमिकेला १००% न्याय देणारा हा अभिनेता आपल्याला लाभला हे आपले अहोभाग्यच समजावे लागेल. महत्वाचं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आजवर एकदाही मर्यादा ओलांडलेली नाही. कोणत्याही टप्प्यावर नारीशक्तीचा अपमान होऊ दिलेला नाही. रंगमंचावर उभी केलेली प्रत्येक भूमिका वठवली ती संपूर्ण अभ्यास करूनंच! तिथून पुढे या बहुगुणी अभिनेत्याने सिनेमाकडे झेप घेतली ती सुद्धा स्वतःच्या अनोख्या शैलीत! कधी महात्मा गांधीजी बनून खुद्द मुन्नाभाईला शिकवण दिली, तर कधी राजस्थानी गावकरी बनून अगदी खलनायकाची भूमिकादेखील साकारली. मी स्वात:ला खूप भाग्यशाली समजते की मला एका उपक्रमाअंतर्गत या अभिनयाच्या देवाला प्रत्यक्ष भेटता आलं. त्याबद्दल, मी आधी नमूद केलंदेखील आहे. जर तुम्ही वाचलं नसेल तर इथे नक्की वाचा! स्वप्नपूर्ती – दिलीप प्रभावळकरांशी झालेली ग्रेट भेट
सारांशच सांगायचा झाला तर इतकी प्रतिभाशाली आणि तरीही इतकी प्रेमळ आणि नम्र व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पहिली नाही तर, अशा या प्रयोगशील आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची म्हणजेच दिलीप प्रभावळकरांची काही बहुरंगी नाटकं तुमच्या भेटीला आणत आहोत.