कोल्हापुरातील ‘भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र’ ही संस्था गेली २५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे. नाट्यनिर्मिती, नाट्यप्रशिक्षण, साहित्य आणि भाषा विषयक प्रकल्प असे अनेक महत्त्वाचे उपक्रम या संस्थेत सातत्याने राबविले जातात. ‘डॉ. हिमांशू स्मार्त’ यांच्या मार्गदर्शनाखाली भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र तर्फे ‘सर्जनशाळा’ ही नाट्यनिर्मिती चालवली जाते. याच भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, सर्जनशाळा प्रस्तुत आणि ‘केल्याने भाषांतर, पुणे’ निर्मित ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ या नाट्यसंचाचा महोत्सव पुणे येथील The Box आणि The Box 2 येथे २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
पुण्यातील ‘केल्याने भाषांतर’ ही संस्था म्हणजे परकीय भाषांमधून आधी इंग्रजी आणि मग मराठीत भाषांतर असा प्रवास न करता थेट मराठीत भाषांतरित केलेल्या साहित्याला वाहिलेले असे हे त्रैमासिक आहे, असं म्हणता येईल. जर्मन, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी, पोलीश, इटालियन, अशा विविध विदेशी भाषांमधून भाषांतरित केलेले साहित्य या संस्थेत उपलब्ध आहे. मग त्या कथा, कविता, एकांकिका असो किंवा कादंबरीतील काही भाग, चरित्र, आत्मचरित्र असो. यांच्यातील काही निवडक भाग हे आता पर्यंत प्रकाशितही झालेले आहेत. याच केल्याने भाषांतर संस्थेच्या साहित्याचे सादरीकरण कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, सर्जनशाळा, सादर करणार आहे. तरी या नाट्यसंच महोत्सवाचा आस्वाद सर्व पुणेरी कलाकारांनी घ्यावा.
‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ हा उपक्रम ललित कला केंद्र, गुरुकुल या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परफॉर्मिंग आर्ट्स विभागाच्या विस्तार कार्यक्रम सहयोगाने सादर होत आहे. ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ या नाट्य उपक्रमात, ‘थ्री टॉप हॅट्स’ हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे ज्याचे मूळ लेखक मिगेल मिऊरा सांतोस, भाषांतरकार विद्यासागर महाजन आणि दिग्दर्शक शुभम पदे हे आहेत. ‘द स्वीचमन’, ‘ध्रुवीय अस्वलं’, ‘गवताचं पातं’ आणि ‘घाबरण शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या माणसाची गोष्ट’ अशा चार कथांचे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तसेच ‘आस्या’ आणि ‘खूप ऑर्डर्स असलेले उपहारगृह’ या दोन कथांचे अभिवाचन, होणार आहे.
महोत्सवाची प्रवेशिका
प्रवेश मूल्य: ५००/- संपूर्ण महोत्सव, ३००/- एक दिवस
तिकिटांसाठी संपर्क: मनाली — ९२८४७६५८५१, जयदीप — ७०५८४५८००९
महोत्सवाचे वेळापत्रक
२८ नोव्हेंबर २०२४ — सायंकाळी ६ ते १०
द स्वीचमन — कथेचे नाट्य सादरीकरण
मूळ लेखक : खुआन खोसे अरिओला
भाषांतर : विद्यासागर महाजन
दिग्दर्शक : शुभम पदे
थ्री टॉप हॅट्स — दोन अंकी नाटक
मूळ लेखक: मिगेल मिऊरा सांतोस
भाषांतर: विद्यासागर महाजन
दिग्दर्शक: शुभम पदे
२९ नोव्हेंबर २०२४ — सायंकाळी ५ ते १०
कथा अभिवाचन: आस्या
मूळ लेखक: एवान तूर्गेनेव
भाषांतर: अनघा भट
कथा अभिवाचन: खूप ऑर्डर्स असलेले उपहारगृह
मूळ लेखक: केन्जी मियाझावा
भाषांतर: निसीम बेडेकर
वाचकस्वर: डॉ. हिमांशू भूषण स्मार्त व ओंकार थोरात
कथांचे नाट्य सादरीकरण
• ध्रुवीय अस्वलं
मूळ लेखक: मारी लुईझं काश्नीट्स
भाषांतर: साकेत देखणे
नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन: जयदीप कोडोलिकर
• गवताचं पातं
मूळ लेखक: मारी लुईझं काश्नीट्स
भाषांतर: सुनंदा विद्यासागर महाजन
नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन: अवंतिका कवठेकर
• घाबरणं शिकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या माणसाची गोष्ट
मूळ लेखक: यकोब आणि विल्हेल्म ग्रिम
भाषांतर: साकेत देखणे
नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन: अमेय कवठेकर
केल्याने भाषांतर, पुणे निर्मित आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व सर्जनशाळा कोल्हापूर प्रस्तुत तिकडून आणलेल्या गोष्टी या नाट्यसंच महोत्सवास रंगभूमी.com तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा!