रंगभूमी.com च्या ऑनलाईन नाट्यगृहात रंगणार आहे… रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव आयोजित जागतिक ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव २०२०-२१!
महोत्सवाची सुरुवात स्पर्धा स्वरूपात आधीच झालेली असुन अमेरिकेहून ८ तर दुबईहून ३ प्रवेशिका आल्या आहेत. प्रथम फेरीमध्ये स्वतःला सिद्ध करून १६ संस्थांनी दिमाखात अंतिम फेरीत पदार्पण केले आहे. या अंतिम फेरीमधील १६ संस्थांचे सादरीकरण तुम्ही फेसबुकवर रंगभूमी.com च्या ऑनलाईन नाट्यगृहात बघू शकणार आहात.
ऑनलाईन मराठी अभिवाचन महोत्सव
२४ डिसेंबर ते २७ डिसेंबर अशा ४ दिवसांमध्ये सायंकाळी ७-९ या वेळेत प्रत्येकी ४ संस्थांचे सादरीकरण दररोज बघता येणार आहे. त्यानंतर ९ ते १० या वेळात स्पर्धक, परीक्षक, आयोजक आणि प्रेक्षक ह्यांची रोज Zoom मीटिंग होईल, ज्यात खुली चर्चा, मार्गदर्शन, शंका समाधान, आणि समीक्षण असं मिटींगचे स्वरूप असेल. अभिवाचनाचा खरा आनंद ह्यामुळे घेता येणार आहे.
ऑनलाईन मराठी अभिवाचन महोत्सव वेळापत्रक
ऑनलाईन अभिवाचन महोत्सव: तिकीट विक्री
पुढील लिंकवर महोत्सवाची तिकीट विक्री सुरू आहे.
तिकीट विक्री बद्दल काही शंका असल्यास आम्हाला 999-256-256-1 वर संपर्क करा.
सर्वोत्कृष्ट प्रक्षक स्पर्धा
या संपूर्ण महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे परीक्षकांचा निर्णय तर लागणार आहेच, परंतु तमाम प्रेक्षकांना देखील एक आकर्षण आहे. जो प्रेक्षक हे चारही दिवस सलग उपस्थित राहून, होणाऱ्या चर्चेमध्ये आपली मते हिरीरीने मांडून स्वतःचा एक खास निर्णय तयार करेल, आणि ज्याचा निकाल परीक्षकांच्या निकालाशी मिळतं जुळता होईल, त्याला खास सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पारितोषिक रु. १०००/-आणि इ-प्रमाणपत्र मिळणार आहे.
प्रेक्षकांनी २८ डिसेंबर रोजी +91 94239 39420 किंवा +91 94206 66129 या क्रमांकावर त्यांची मते नोंदवायाची आहेत. नुसता वाचन ऐकण्याचा आनंद घ्यायचा नाही तर परीक्षकांसोबत निकाल देवून एक गुणग्राही रसिक म्हणून सिद्ध करण्याची ही संधी आहे.