मराठी साहित्याला अनेक दिग्गज लाभले आहेत. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, एकांकिका व नाटकांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अफाट ताकद होती. या अजरामर साहित्याबद्दल आजच्या पिढीला कळावं, या दिग्गजांचे साहित्य नवीन पिढीनं वाचावं आणि ते साहित्य नव्या शैलीत सादर करावं, या हेतूने ‘ओम आर्टस्‘ आयोजित करत आहेत ‘रत्नाकर करंडक २०२२’! ‘रत्नाकर करंडक’च्या पहिल्या वर्षाचे मानकरी अर्थातच मराठी वाचकांचे लाडके लेखक रत्नाकर मतकरी असणार आहेत. रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याच्या आधारावर रचलेल्या एकांकिका या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.
प्रवेश प्रक्रिया
प्राथमिक फेरीसाठी, प्रथम संपर्क साधलेल्या संघांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एका केंद्रावर फक्त १० संघांना प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या संघांनी लवकरात लवकर संपर्क करणे आवश्यक आहे.
प्रवेशाची अंतिम तारीख — ३० एप्रिल
स्पर्धेचे प्रवेश शुल्क — ३०००/-
प्रवेश शुल्क Google Pay करण्यासाठी संपर्क — भूषण देसाई: ९९६०३००९६६
प्रवेश निश्चित झालेल्या संघांनी आपल्या एकांकिकेसाठी निवडलेल्या साहित्यप्रकाराचा व निवडलेल्या विषयाचा तपशील आयोजकांना २० ते २५ मे पर्यंत कळवणे बंधनकारक आहे.
विजेत्यांसाठी भरगच्च पारितोषिके
स्पर्धेत विजेत्या संघांना पारितोषिकांसह रोख रक्कमदेखील देण्यात येणार आहे.
प्रथम पारितोषिक — १,००,०००/-
द्वितीय पारितोषिक — ७५,०००/-
तृतीय पारितोषिक — ५०,०००/-
प्रवेश अर्जासाठी व स्पर्धेबाबत काही शंका असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
भूषण देसाई: ९९६०३००९६६
अनिकेत शहाणे: ९३२०२८२००६
प्राथमिक फेरी ते अंतिम फेरी — महत्वाच्या तारखा
प्राथमिक फेरी — १ जून ते २० जून, २०२२
पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर आणि गोवा, या एकूण ११ केंद्रांवर ‘रत्नाकर करंडक’ ची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर केवळ १० संघांना प्रवेश दिला जाणार असून, त्यामधून दोन एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात येतील.
प्राथमिक फेरीचा निकाल त्याच दिवशी रात्री ऑनलाईन लावण्यात येईल.
अंतिम फेरी — २६ ते ३० जून, २०२२ बालगंधर्व नाट्यगृह, पुणे, येथे पार पडणार आहे.
काय आहे ‘रत्नाकर करंडक’?
रत्नाकर मतकरी यांचं नाव प्रथम लोकांपुढे आलं ते एकांकिका या साहित्य-नाट्य प्रकारातून, आणि त्यांनी पुढे लोकप्रिय केलेल्या गूढकथांचं मूळ, नाटकांमधल्या भावनाट्याचा संक्षेप, आपल्याला या एकांकिकांमधे सापडतो. त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या स्मृतीप्रीत्यर्थ, त्यांना व त्यांच्या कार्याला मानवंदना देता यावी ह्या हेतूने रत्नाकर करंडक हे नाव आयोजकांनी या स्पर्धेसाठी उचित समजलं.
मराठी साहित्यातील दिग्गज लेखकांच्या साहित्यावर आधारित नवीन एकांकिका सादर व्हाव्यात हा ‘रत्नाकर करंडक’ चा मानस आहे. दरवर्षी एका नवीन साहित्यिकाच्या साहित्यावर आधारित असलेल्या या एकांकिकांवर ही स्पर्धा पार पडेल. रत्नाकर करंडकाच्या पहिल्या वर्षी मराठी वाचकांचे लाडके लेखक- रत्नाकर मतकरी यांच्या साहित्याच्या आधारावर रचलेल्या एकांकिका या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. स्पर्धक रत्नाकर मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या, कविता, ललित लेख, इत्यादी अनेक साहित्य प्रकारांपैकी कोणत्याही एका साहित्यप्रकाराच्या आधारावर त्यांची एकांकिका सादर करू शकतात.
‘रत्नाकर करंडक’चे आयोजक
रत्नाकर करंडक भूषण देसाईंच्या संकल्पनेतून जन्माला आलं. चित्रपट, जाहिराती व नाटकांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून ते कार्यरत राहिले आहेत. व्यवसायाने प्रकाशयोजनाकार असलेले भूषण देसाई, रत्नाकर मतकरींना लहानपणापासून बघत आले आहेत व त्यांच्याबरोबर ७-८ वर्ष काम केलं आहे. रत्नाकर मतकरींच्या नाटकांमधील प्रकाशयोजनेची बाजूदेखील ते स्वतः सांभाळायचे. रत्नाकर करंडक ही रत्नाकर मतकरींच्या नाट्यसृष्टीतील योगदानाची परतफेड करणारी एकांकिका स्पर्धा आहे असे आयोजक भूषण देसाई सांगतात.
स्पर्धेचे नियम व अटी
स्पर्धेच्या काही महत्वाच्या अटी व सूचना आहेत. एकांकिका कमीत कमी ३० मिनिट व जास्तीत जास्त ४५ मिनिटांच्या असल्या, तरच संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. मतकरींच्या साहित्यावर आधारित असलेल्या या एकांकिकेचा या स्पर्धेत सादर होणारा प्रयोग, स्पर्धक संघाचा पहिला प्रयोग असावा अशी अट आहे. सर्व स्पर्धक संघांनी ही एकांकिका मूळ साहित्याचे रूपांतर आहे हे लक्षात ठेऊन, लेखकाचे नाव रत्नाकर मतकरी हेच नमूद करणे बंधनकारक आहे. वेगळ्या रूपांतरकाराचे नाव लेखक म्हणून देता येणार नाही व कोणत्याही प्रयोगाच्या सादरीकरणासाठी, श्रीमती प्रतिभा मतकरी यांची परवानगी घेणे प्रत्येक सहभागी संघाला आवश्यक आहे.
प्राथमिक फेरीसाठी, प्रथम संपर्क साधलेल्या संघांना प्राधान्य दिलं जाणार आहे व आधी सांगितल्याप्रमाणे एका केंद्रावर फक्त १० संघांना प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या संघांनी लवकरात लवकर संपर्क करणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क ३०००/- आहे व ते खाली नमूद केलेल्या संपर्कांवर ३० एप्रिलपर्यंत गूगल पे करायचे आहे. प्रवेश निश्चित झालेल्या संघांनी आपल्या एकांकिकेसाठी निवडलेला साहित्यप्रकाराचा व निवडलेल्या विषयाचा तपशील आयोजकांना २० ते २५ मे पर्यंत कळवणे बंधनकारक आहे.
प्रवेश शुल्क Google Pay करण्यासाठी संपर्क — भूषण देसाई: ९९६०३००९६६
‘नवनवीन कल्पनेने रत्नाकर मतकरींसह इतर दिग्गजांच्या साहित्याला स्वतःच्या नजरेतून पाहून, युवा पिढीने रसिकांसमोर एक दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण अशी कलाकृती सादर करावी’ असे तमाम हौशी व होतकरू कलाकारांना, रत्नाकर करंडकाच्या आयोजकांनी आवाहन केले आहे. तेव्हा या अनोख्या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी समावेश करून रत्नाकर करंडकाच्या पहिल्या वर्षाला उदंड प्रतिसाद द्यावा.
‘NLP इन मराठी’ ची कार्यशाळा रत्नाकर करंडकच्या मंचावर!
२६ ते ३० जून बालगंधर्व नाट्यगृह, पुणे, येथे रत्नाकर करंडकची अंतिम फेरी पार पडणार आहे. शेवटची एकांकिका सादर झाल्यावर आणि परीक्षक अंतिम निर्णय सांगेपर्यंत, साधारण पाऊण तासाच्या कालावधीत अतिशय उपयोगी असे NLP, म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या मोफत कार्यशाळेचा लाभ सर्व सहभागी कलाकारांना घेता येणार आहे. NLP मास्टर प्रॅक्टिशनर सीमा देसाई नायर NLP चे हे तंत्र, मराठी भाषेत सर्व सहभागी कलाकारांना ‘NLP इन मराठी’ या कार्यशाळेमार्फत शिकवणार आहेत.
NLP बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
1 Comment
Pingback: NLP ची कार्यशाळा रत्नाकर करंडकच्या मंचावर! • रंगभूमी.com