रंगगंध कलासक्त न्यास, चाळीसगाव या संस्थेद्वारे गेले काही दिवस एक अभिनव उपक्रम ऑनलाईन माध्यमातून राबविला जात आहे. या उपक्रमाचे नाव ‘गीत मेरे मनके‘ असे आहे. नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की या कार्यक्रमात संगीताची एक सुरेल मैफिलच रंगणार आहे. पण या उपक्रमात तुम्हाला निव्वळ गाणेच नाही तर त्या गाण्याचे रसग्रहणही ऐकावयास मिळणार आहे.
रसग्रहण म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर गाणे संपूर्णपणे समजून घेणे. गीतकराला गाण्यातून काय सांगायचे आहे म्हणजेच तिची मध्यवर्ती कल्पना, भावना, विचार, नादमाधूर्य, चाल, अलंकार, गाण्याचा प्रकार, सूचकता, विडंबन या साऱ्याचा अभ्यास म्हणजेच रसग्रहण. ही आगळवेगळी संकल्पना महेश सोनवणे यांची आहे.
रविवार दिनांक १४ मार्च रोजी या अभिव्यक्ती सभेत एक जुनं अनवट थेट १९५९ साली प्रकाशित झालेलं इंदिरा संत यांचे शब्द, दशरथ पुजारी यांचे स्वर आणि सुमन कल्याणपूर यांच्या मधाळ कंठातून आलेलं ‘अजून नाही जागी राधा’ हे गाणं सादर होणार आहे. पण आता अभिजीत पंचभाई यांच्या रसग्रहणानंतर या गाण्याला एक नवा उजाळा मिळणार आहे आणि गाण्याची मजा शतपटीने वाढणार आहे. जरूर ऐका हे आठवणीतलं गोड गाणं!
शिवाय काही तांत्रिक कारणांमुळे राहून गेलेला सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाचा “बोलीभाषा विशेष भाग २” सुद्धा या रविवारच्या अभिव्यक्ती सभेत सादर होणार आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला Zoom Meeting मध्ये सायंकाळी ५ वाजता बघता येणार आहे. Zoom Meeting साठी पुढील माहितीचा वापर करा.
Link: https://us02web.zoom.us/j/7552636275
Meeting ID: 755 263 6275
Passcode: Rang94