रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेबद्दल तुम्ही आमच्या पेजवर सगळी माहिती वाचलीच असेल.
जर तुम्हाला रत्नाकर करंडकबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
दिग्गजांच्या साहित्याला एक नवा श्वास देणारी ‘रत्नाकर करंडक’!
रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २६ ते ३० जून बालगंधर्व नाट्यगृह, पुणे, येथे रत्नाकर करंडकची अंतिम फेरी पार पडणार आहे. शेवटची एकांकिका सादर झाल्यावर आणि परीक्षक अंतिम निर्णय सांगेपर्यंत, साधारण पाऊण तासाच्या कालावधीत अतिशय उपयोगी असे NLP, म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या मोफत कार्यशाळेचा लाभ सर्व सहभागी कलाकारांना घेता येणार आहे. NLP मास्टर प्रॅक्टिशनर सीमा देसाई नायर NLP चे हे तंत्र, मराठी भाषेत सर्व सहभागी कलाकारांना ‘NLP इन मराठी’ या कार्यशाळेमार्फत शिकवणार आहेत.
काय आहे NLP?
NLP म्हणजे न्यूरो (मेंदू आणि मज्जासंस्था), लिंग्विस्टिक (भाषिक आणि अ-भाषिक), प्रोग्रामिंग (पुनरावृत्ती करता येण्याजोगे नमुने), किंवा स्वतःला आणि इतरांना अधिक वेळा सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी वापरलेली भाषा. एक कलाकार म्हणून, प्रत्येकाला यशाचा स्वतःचा अनोखा मार्ग तयार करावा लागतो. NLP हे अभिनयाविषयीची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी, अभिनय कौशल्ये सुधारण्यासाठी व स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी पडणारं तंत्र आहे.
प्रेक्षकांचा प्रतिसाद हा कलाकारांसाठी सर्वश्रेष्ठ असतो. भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे, हा कुठल्याही अभिनेत्याचा मूळ हेतू असतो. ती भूमिका कशी आहे आणि काय सांगू इच्छिते हे जर प्रेक्षकांना समजलं नाही तर बाकी सगळे प्रयत्न निष्फळ होतात. सर्जनशील, केंद्रित, भयभीत, या अनेक भावनांना प्रेक्षकांसमोर मांडताना NLP ही प्रक्रिया अतिशय उपयोगी ठरते.
एक कलाकार जितक्या लवकर एका भूमिकेतून अलिप्त होईल तितक्या लवकर तो दुसऱ्या भूमिकेशी जोडला जाऊ शकतो. जोड आणि अलिप्तपणा- यांचा सुरेख संगम जो घालू शकला, तोच नाटकाच्या व जीवनाच्या रंगमंचावर यशस्वी झाला असे म्हणू शकतो. ही ताकद एका कलाकारासाठी अतिशय महत्वाची आहे आणि NLP चे तंत्र जोड आणि अलिप्तपणा शिकायला फार मदत करते. ओप्राह विनफ्री, लिली ऍलन, गेरी हल्लीवेल्ल, जिम्मी कार सारखे दिग्गज कलाकार देखील NLP च्या तंत्राचा सराव करतात.
NLP चे फायदे-
- कामगिरी चिंता कमी करणे
- स्पष्ट संप्रेषण सक्षम करणे
- निर्णयाची स्वीकृती करणे
- कृतन्यतेची भावना वाढवणे
- आत्मविश्वास वाढवणे
रत्नाकर करंडक एकांकिका स्पर्धेच्या निम्मिताने ही संकल्पना स्पर्धेच्या ११ सेन्टर्सच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहचवण्याचं मिशन घेऊन, ‘NLP इन मराठी’ हा या स्पर्धेचा एक मुख्य भाग म्हणून ठेवला आहे. ”आपल्या सर्वांबरोबर हे तंत्र शेअर करताना मला अतिशय आनंद होत आहे. कलाकारांचा उत्साह वाढवणारं हे तंत्र खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार हे नक्की”, असे सीमा देसाई नायर सांगतात. NLP चे संशोधन मुख्यतः इंग्रजी भाषेत झाले आहे. परंतु आता हे मराठी भाषेत आणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सीमा देसाई नायर ह्यांचा उद्देश आहे.
रत्नाकर करंडकमध्ये अशी कार्यशाळा होणं म्हणजे कलाकारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण रत्नाकर करंडकमध्ये सहभागी होणारा प्रत्येक कलाकार काहीतरी शिकून बाहेर पडणार हे नक्की. तेव्हा लवकरात लवकर कलाकारांनी रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन ‘NLP इन मराठी’ या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.
1 Comment
Pingback: रत्नाकर करंडक - मराठी साहित्यावरच्या एकांकिकांची स्पर्धा