‘मानाची’ संघटनेच्या, अर्थात, मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी ६ मे, २०२४ रोजी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे पार पडली. अटीतटीचा सामना झाला. अंतिम फेरीत ‘चौदा इंचाचा वनवास’ (संहिता क्रिएशन्स, मीरा रोड) आणि ‘A Tale of Two’ (BMCC, पुणे) या दोन एकांकिकांनी बाजी मारली!
‘मानाची’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मानाची लेखक संघटनेचं ब्रीदवाक्य आहे ‘लेखकांनी लेखकांची लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना’! लेखकांसाठी इतका भव्य सोहळा आयोजित करणाऱ्या या संघटनेच्या कार्यकारी समितीचे सर्वप्रथम आभार आणि कौतुक!
उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचे स्वरूप
स्पर्धक संघाना देण्यात आलेल्या २० विषयांमधून दोन विषयांच्या चिठ्ठ्या उचलून त्यातील त्यांना आवडलेला एक विषय निवडून त्यावर सादरीकरण करायचं असतं. हे २० विषय मान्यवर लेखक व दिग्दर्शक ठरवतात. या सादरीकरणाच्या तालमीसाठी त्यांना २ तासांचा अवधी देण्यात येतो. नंतर २० मिनिटे सादरीकरणासाठी दिली जातात. ज्येष्ठ रंगकर्मी विश्वास सोहोनी, हेमंत भालेकर आणि शिल्पा नवलकर हे प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून लाभले होते.
यंदाच्या स्पर्धेत १४ स्पर्धक संघ सहभागी झाले होते. या चौदा संघांमधून पुढील ५ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीसाठी डॉ. गिरीश ओक, ईला भाटे, विश्वास सोहोनी, हेमंत भालेकर आणि शिल्पा नवलकर अशी दिग्गज मंडळी परीक्षणाची धुरा सांभाळत होती.
अंतिम फेरीत प्रवेश करणारे स्पर्धकसंघ
१) चौदा इंचाचा वनवास
संहिता क्रिएशन्स, मीरा रोड
२) Who is the Culprit?
स्वामी नाट्यांगण, डोंबिवली
३) माझा पक्ष, पितृपिक्ष
कलाघर, ठाणे
४) A Tale of Two
BMCC, पुणे
५) खूप लोक आहेत.
अभिनय, कल्याण
अंतिम निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक
चौदा इंचाचा वनवास(संहिता क्रिएशन, मुंबई)
सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय क्रमांक
(कवी कै. रामचंद्र विष्णू कोंडेकर स्मरणार्थ डॉ.अलका नाईक पुरस्कृत रोख 15000 रुपये आणि सन्मानचिन्ह)
A Tale of Two(बीएमसीसी पुणे)
सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम क्रमांक
(गंगाराम गवाणकर पुरस्कृत रोख रुपये 11000/- आणि सन्मानाचिन्ह)
कार्तिक बहिरट आणि राज दीक्षित(एकांकिका : A Tale of Two, बीएमसीसी, पुणे)
सर्वोत्कृष्ट लेखक द्वितीय क्रमांक
(कै. सुरेश नारायण दरेकर स्मरणार्थ सचिन दरेकर पुरस्कृत रोख 9000/-आणि सन्मान चिन्ह)
रोहित कोतेकर ,रोहन कोतेकर ,केतन साळवी(एकांकिका :चौदा इंचाचा वनवास)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक
(आशिष पाथरे पुरस्कृत रोख 5000/- आणि सन्मानचिन्ह )
रोहित कोतेकर ,रोहन कोतेकर ,केतन साळवी (एकांकिका: चौदा इंचाचा वनवास)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक
(कै. सिंधू औंधे स्मरणार्थ अरविंद औंधे पुरस्कृत रोख तीन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
कार्तिक बहिरट(A Tale of Two)
सर्वोत्कृष्ट कथा विस्तार प्रथम
कार्तिक बहिरट/राज दीक्षित (A Tale of Two, बीएमसीसी पुणे)
सर्वोत्कृष्ट कथा विस्तार द्वित्तीय
(लेखक कवी कै.राजा गायंगी स्मरणार्थ शिल्पा गायंगी गंजी पुरस्कृत रोख दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह)
रोहित कोतेकर ,रोहन कोतेकर ,केतन साळवी (एकांकिका: चौदा इंचाचा वनवास)
विनोदी अभिनेता
(कै. पद्माकर तांबे स्मरणार्थ सुनीता तांबे पुरस्कृत रोख दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह )
राज दीक्षित (एकांकिका: A Tale of two)
विनोदी अभिनेता
(कै. भालचंद्र घाडीगावकर स्मरणार्थ अरुण घाडीगावकर पुरस्कृत रोख दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह )
अमेय परब(एकांकिका: चौदा इंचाचा वनवास)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक
(कै.याज्ञसेना देशपांडे स्मरणार्थ राजेश देशपांडे पुरस्कृत रोख तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
श्रेयसी वैद्य (‘खूप लोक आहेत’, अभिनय, कल्याण)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय क्रमांक
(कै. लतिफा काझी स्मरणार्थ खलिदा शेख पुरस्कृत 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह )
साक्षी पाटील (Who is the culprit, स्वामी नाट्यांगण ,डोंबिवली)
अभिनेता प्रथम क्रमांक
(कै. कुमुदिनी गोविंद आपटे स्मरणार्थ विवेक आपटे पुरस्कृत रोख तीन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह.)
रंजन प्रजापती (चौदा इंचाचा वनवास)
अभिनेता द्वितीय क्रमांक
(कै. एम एम काझी स्मरणार्थ खलिदा शेख पुरस्कृत 2000 रुपये आणि सन्मानचिन्ह )
रोशन मोरे(‘खूप लोक आहेत.’, अभिनय कल्याण)
विशेष लक्षवेधी सादरीकरण
नम्रता कलाविष्कार नाशिक (प्राथमिक फेरी)
सर्वोत्कृष्ट रंगमंच व्यवस्थापन
(नर्मदा डिझाईन फाउंडेशन तर्फे उमेश ओमाशे पुरस्कृत रोख दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह)
स्वामी नाट्यांगण, डोंबिवली
सर्वोत्कृष्ट रंगभूषा
(कै. रोहिणी दामोदर सावंत स्मरणार्थ विठ्ठल सावंत पुरस्कृत रोख दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह )
कार्तिक बहिरट (‘A tale of Two’, बीएमसीसी पुणे)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा
(मालती यादव आदरार्थ भावना सोनावणे पुरस्कृत रोख दोन हजार रुपयांनी सन्मानचिन्ह)
मधुरा राऊत आणि रिद्धी टेंबवलकर(चौदा इंचाचा वनवास)
सर्वोत्कृष्ट संगीत
(सुलभा चव्हाण पुरस्कृत रोख दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह एकांकिका )
शुभम ढेकळे (चौदा इंचाचा वनवास)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य
(शिघ्र नागरी लिपीकार कै.डॉ. श्री वा भागवत स्मरणार्थ भागवत कुटुंबाकडून रोख दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह )
कार्तिक बहीरट आणि अथर्व ढेबे (‘A tale of two’)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
(रोहिणी दामोदर सावंत स्मरणार्थ विठ्ठल सावंत पुरस्कृत रूपये दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह )
निखिल मारणे (A Tale of Two, BMCC पुणे)
स्पर्धेत विजयी ठरलेल्या सर्व स्पर्धक संघांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि लेखकांसाठी इतक्या भव्य स्वरूपातील स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार! पुढील वर्षी यावर्षीहून अधिक संघ स्पर्धेत सहभागी होतील आणि मानाची लेखन संघटनेचा मान व उंची अधिकाधिक वाढवतील अशी आशा आपण व्यक्त करू.