शासनाच्या आदेशानुसार आता ५०% प्रेक्षक उपस्थितीत नाटकं बघता येत आहेत. तब्बल दीड वर्षानंतर रंगभूमी पुनर्जिवित झाली आहे. रंगकर्मींना आज प्रेक्षकांच्या सहकार्याची जेवढी गरज आहे तेवढीच प्रेक्षकांनाही नाटकातून होणाऱ्या निखळ मनोरंजनाची गरज आहे. म्हणूनच, प्रेक्षक आणि रंगकर्मींमधील दुवा बनत आम्ही तुम्हाला एक सुवर्णसंधी देत आहोत. एक अनोखी स्पर्धा आयोजित करत आहोत. या स्पर्धेमध्ये या महिन्यात सहभागी होणार आहेत ४ नाट्यगृहे, ४ प्रयोग, १ दर्जेदार नाटक आणि लाखो प्रेक्षक!
आम्ही दर महिन्यात एका नाटकाची दोन तिकिटे जिंकण्याची तुम्हाला संधी देणार आहोत. या महिन्यातील नाटक आहे कल्याणी पाठारे लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘दादा, एक गुड न्यूज आहे‘. या नाटकाचे समीक्षण तुम्ही वाचले नसेल तर नक्की वाचा.
दादा, एक गुडन्यूज आहे [Review] — भाऊ-बहिणीच्या निर्मळ नात्याची ‘गुडन्यूज’
ह्या Giveaway मध्ये सहभागी कसे व्हाल?
- वरील पर्यायांपैकी तुम्हाला जे नाट्यगृह आणि वेळ सोयीचे वाटेल त्या पर्यायावरील बटनवर क्लिक करून तुम्ही स्पर्धेत प्रवेश घेऊ शकता.
- पुढील स्क्रीनवर तुमचा ई-मेल विचारला जाईल. तो भरून किंवा फेसबूकचा वापर करून ‘Enter’ बटनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला स्क्रीनवर एक यादी दिसेल. या यादीतील प्रत्येक कृती तुम्ही पूर्ण केली तुम्हाला त्या कृतीसमोर नमूद केलेले पॉईंट्स मिळतील. जास्तीत जास्त कृती पूर्ण करून तुम्ही जास्तीत जास्त ‘एन्ट्री पॉईंट्स’ मिळवू शकता. जेणेकरून, तुमची विजेता होण्याची शक्यता वाढेल.
ह्या Giveaway चे विजेते कधी घोषित होतील?
नमूद केलेल्या प्रयोगांच्या दोन दिवस आधी लकी ड्रॉने विजेता घोषित केला जाईल. त्यामुळे तुमचे एन्ट्री पॉईंट्स जास्त असल्यास लकी ड्रॉमध्ये तुमचे नाव येण्याच्या शक्यताही वाढतील. विजेत्याला मिळतील ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ नाटकाची दोन तिकिटे! चार नाट्यगृहांमधील चार प्रयोग आणि चार प्रयोगांचे प्रत्येकी दोन विजेते आणि दोन विजेत्यांना प्रत्येकी दोन तिकिटे अशी एकूण १६ तिकिटे आम्ही विजेत्यांसाठी घोषित करत आहोत.
तुम्हाला काहीही शंका असल्यास [email protected] या ई-मेल आयडीवर अथवा ९९९-२५६-२५६-१ या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा.
आम्ही आशा व्यक्त करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हाल!