पु. ल. देशपांडे म्हणजे मराठी साहित्यातलं मोठं नाव! मराठी मातीतली अशी एकही व्यक्ती नसेल जी पुलंना ओळखत नसेल. आपण पुलंच्या लेखणीला ओळखतो, त्यांचं साहित्य ओळखतो. आपल्या माहितेतले पु. ल. देशपांडे म्हणजे जे त्यांच्या लेखणीतून आपल्या समोर आले व आपण त्यांचा चित्र आपल्याया मनात निर्माण केलं. पण पुलंना आपण खऱ्या अर्थाने ओळखतो का? खळखळून हसवणाऱ्या या आनंदयात्रीची अपरिचित बाजू दाखवणारा प्रयोग म्हणजे ‘पुरुषोत्तम‘.
स्वातंत्रवीर सावरकर सेवा केंद्र यांच्या सहकार्याने क्रेसेंट थिएटर आयोजित आणि प्रयोगशाळा प्रस्तुत, पुरुषोत्तम हे सादरीकरण, आजवर आपल्या मनात, डोक्यात, विचारात पुलंविषयी असलेल्या साचेबद्ध प्रतिमेच्या पलीकडे जाऊन एक वेगळे ‘पुरुषोत्तम’ आपल्या समोर सादर करण्याचे प्रयत्न करते. तक्षिल खानविलकर, सुमेध समर्थ आणि मल्हार शितोळे या अभिवाचनाचे सादरीकरण करतात.
प्रयोगशाळा या संकल्पनेची योजना ही मुख्यतः तरुण रसिक वर्गाला आकर्षित करण्यासाठी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयोगांचे प्रवेश शुल्क अगदी कमी असते. तरुण पिढी नाटकांकडे वळावी यासाठी त्यांना आवडतील असे वेगळे विषय त्यांच्या समोर घेऊन यायचा प्रयोगशाळेचा मानस आहे. म्हणूनच विनोदी पु. ल. किंवा त्यांच्या विनोदी लेखनावरचा कार्यक्रम करून रसिक मिळवणे सोपे असूनही, पुलंची अपरिचित, अप्रकाशित आणि चिंतनशील बाजू जगापुढे आणण्याचा वेगळा प्रयत्न ते करत आहेत.
पुरुषोत्तम या सादरीकरणात पुलंच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग, काही अनन्यसाधारण व्यक्तींविषयी असलेली त्यांची भावना व त्यांचं व्यक्त होणं असे बरेच पदर उलगडले जातील. पुरुषोत्तमचा पहिला प्रयोग १९ डिसेंबर २०२१ रोजी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, येथे पार पडला. कोरोनाच्या लाटेमुळे जानेवारी महिन्यात आखलेला प्रयोग रद्द झाला.
येत्या २७ फेब्रुवारीला, म्हणजेच मराठी भाषादिनानिमित्त, पुरुषोत्तमचा दुसरा प्रयोग स्वातंत्रवीर सावरकर सेवा केंद्र, विलेपार्ले (पूर्व), मुंबई, येथे पार पडेल. प्रयोगाची वेळ सायंकाळी ६.३० वाजता असून प्रवेश शुल्क फक्त १०० रुपये आहे. तेव्हा रसिकप्रेक्षकांनी पुरुषोत्तम या प्रयोगाला आवर्जून भेट द्यावी.
तिकिटांसाठी संपर्क: ९८३३६८९७७४, ९८९२५०३८६०