लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी प्रार्थना सर्वच रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक करीत आहेत. काही रंगकर्मींनी मात्र या बिकट परिस्थितीशी दोन हात करत Online माध्यमातून नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा ध्यास घेतलेला आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनय कल्याण संस्थेचे संस्थापक अभिजीत झुंजारराव. अभिजीत झुंजारराव यांनी फक्त एक नाटक नाही तर चार विविध नाटकांचा नाट्य महोत्सव Online माध्यमातून भरवण्याचे आयोजिले आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य असे आहे की चार विविध शहरांमधील चार विविध संस्था या महोत्सवासाठी एकत्रित येत आहेत — थिएटर प्रीमियर लीग २०२०.
थिएटर प्रीमियर लीग २०२०
Theatre Premier League 2020 Details / थिएटर प्रीमियर लीग २०२०
सप्टेंबर महिन्यात २४, २५, २६, २७ अशा चार दिवसांमध्ये रात्री ८ वाजता चार विविध नाटकं घर बसल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. प्रत्येक नाटकाचे तिकीट शुल्क फक्त ५५ रुपये असणार आहे. तसेच चारही नाटकांचा एकत्रित सीझन पास घ्यायचा असल्यास त्याची किंमत फक्त १६० रुपये असणार आहे. महोत्सवाच्या तिकीट विक्रीची सुरुवात १० सप्टेंबर पासून झाली आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्था आणि ते सादर करणारी नाटकं पुढीलप्रमाणे आहेत.
Theatre Premier League 2020 Schedule & Dates
कल्याण येथील अभिनय, कल्याण. रत्नागिरी येथील कलांश थियटर. जळगाव येथील परिवर्तन, जळगाव आणि मुंबई येथील प्रयोग मालाड अशा चार संस्था सहभागी होणार आहेत.
लेखक, दिग्दर्शक आणि संस्था यांची नावं वाचून तुमची महोत्सवाबद्दलची उत्सुकता वाढली असेल यात शंकाच नाही. त्यामुळे १० सप्टेंबर पासून या नाट्य महोत्सवाची तिकिटे बुक करा आणि २४ ते २७ सप्टेंबर, थिएटर प्रीमियर लीग २०२० या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटा!
Theatre Premier League 2020 Tickets
थिएटर प्रीमियर लीग २०२० या नाट्यमहोत्सवाबद्दल सर्व माहिती मिळवण्यासाठी व तिकिटे बुक करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
तिकिटे बुक करण्यासाठी पुढील Demo Video ची तुम्हाला नक्कीच मदत होईल.