रंगभूमी.com एकपात्री अभिनय स्पर्धा २०२० साठी खालील नियम व अटी लागू असतील:
- रंगभूमी.com आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
- स्पर्धा प्रौढ (वयोगट १६ वर्ष आणि अधिक) आणि बालगट (वयोगट ५ ते १५ वर्ष) अशा २ गटात विभागली जाईल.
- बाल वर्गातील (वय ५ ते १५) स्पर्धकांनी पालकांचे संमती पत्र दाखल करणे बंधनकारक आहे.
- प्रत्येक वर्गांमध्ये कमीत कमी दहा प्रवेशिका आले तरच स्पर्धा घेतली जाईल.
- सादरीकरणाची भाषा फक्त मराठी असावी.
- व्हिडिओ कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त ७ मिनिटांचा असावा.
- अर्ज देण्याची अंतिम तारीख — २०-०४-२०२०
- एकदा दाखल केलेला अर्ज मागे घेता येणार नाही.
- व्हिडीओ Google Drive, WeTransfer or YouTube वर Upload करून व्हिडीओची link प्रवेशिकेमध्ये दाखल करावी.
- तुमच्या सादरीकरणाचा व्हिडिओ दिनांक १ मार्च, २०२० च्या नंतर shoot केलेला असावा. तसेच, इतर कुठल्याही स्पर्धेमध्ये केलेल्या सादरीकरणाचा व्हिडिओ वैध मानला जाणार नाही.
- प्रत्येक सादरीकरणाचे प्रवेश शुल्क ₹५१/- आहे. तरीही आमच्या Social Media Accounts ना Like, Follow आणि Subscribe करून स्पर्धक मोफत प्रवेश घेऊ शकतात.
- तुमची प्रवेशिका वैध ठरल्यानंतर जर तुम्ही आमच्या Social Media Accounts ना Like, Follow आणि Subscribe करणे बंद केले तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- एकच स्पर्धक एकाहून जास्त प्रवेशिका दाखल करू शकतो. परंतु, प्रत्येक दाखल्यासाठी वेगळा अर्ज आणि शुल्क अनिवार्य आहे.
- स्पर्धेमध्ये दाखल झालेले व्हिडीओ स्पर्धेच्या आणि Website च्या प्रचारासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारे वापरण्याचे सर्व हक्क पूर्णतः रंगभूमी.com कडे असतील.
- स्पर्धेच्या आयोजकांनी घेतलेला प्रत्येक निर्णय अंतिम असेल आणि तो आपल्याला बंधनकारक असेल.
- या स्पर्धेचे आयोजक आणि iXyr Media या स्पर्धेच्या नियमात पूर्णतः किंवा अंशत: बदल करण्याचे/ रद्द करण्याचे/ सुधारण्याचे हक्क स्वत:कडे राखून ठेवीत आहे.
- स्पर्धकांच्या सादरीकरणाच्या आणि रंगभूमी.com च्या प्रचारासाठी विजेत्यांचे व्हिडीओ रंगभूमीच्या YouTube Channel वर Upload केले जातील.
- याव्यतिरिक्त अन्य काही शंका अथवा प्रश्न असतील तर [email protected] या ई-मेल ID वर आमच्याशी संपर्क साधा.