रंगभूमी.com च्या रंगमंचावर प्रथमच खास तुमच्यासाठी Online एकपात्री अभिनय स्पर्धा
कोरोनामुळे उद्भवलेल्या lockdown च्या विळख्यात अडकलेल्या कलाकारांना त्यांच्या घरातच online रंगमंच उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न!
वयोमर्यादा नाही आणि विषयाची मर्यादा देखील नाही. विषय स्वरचित असो किंवा तुमच्या आवडत्या नाटकातील एखादा उतारा, त्याचं स्वागतच केलं जाईल.
वेळेची मर्यादा मात्र आहे. फक्त ५ ते ७ मिनिटे! म्हणजे कमीत कमी ५ मिनिटे आणि जास्तीत जास्त ७ मिनिटे
स्पर्धा प्रौढ वर्ग (वय १६ वर्ष आणि अधिक) आणि बाल वर्ग (वय ५ ते १५ वर्ष) अशा २ गटात विभागली जाईल.
स्पर्धेची भाषा फक्त मराठी असेल.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुमच्या सादरीकरणाचा एक व्हिडीओ Shoot करून प्रवेश अर्जासोबत Online दाखल करावा.
व्हिडीओ कसा बनवाल?
Quarantine मध्ये अडकल्यामुळे, व्हिडीओ बनवण्यासाठी जे साधन तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. कोणताही Camera किंवा Mobile — काहीही चालेल. पण…
काय करू नये?
- Tik-Tok अथवा तशाच इतर App मध्ये बनवलेला अथवा कुठल्याही प्रकारचा ऑडिशन व्हिडीओ स्वीकारला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- तुमच्या सादरीकरणाचा व्हिडिओ दिनांक १ मार्च, २०२० च्या नंतर shoot केलेला असावा. तसेच, इतर कुठल्याही स्पर्धेमध्ये केलेल्या सादरीकरणाचा व्हिडिओ वैध मानला जाणार नाही.
प्रवेशाची अंतिम तारीख – २०-०४-२०२०
स्पर्धेचा निकाल – २५-०४-२०२०
स्पर्धेची पारितोषिके
प्रौढ वर्ग (वय १६ वर्ष आणि अधिक)
प्रथम पारितोषिक – ३०००/-
द्वितीय पारितोषिक – १५००/-
तीन उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रके
बाल वर्ग (वय ५ ते १५ वर्ष)
प्रथम पारितोषिक – १५००/-
द्वितीय पारितोषिक – १०००/-
तीन उत्तेजनार्थ प्रशस्तिपत्रके
स्पर्धेचा निकाल रंगभूमी.com या संकेतस्थाळावर दिनांक २५-०४-२०२० रोजी जाहीर करण्यात येईल.
तसेच विजेत्यांचे व्हिडीओ रंगभूमी.com च्या YouTube चॅनेल वर प्रदर्शित करण्यात येतील.
स्पर्धेमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय करावे लागेल?
खालील पर्यायांपैकी एका पद्धतीने स्पर्धेमध्ये प्रवेश घ्या.
१. शुल्क फक्त रु. ५१/- भरा.
— किंवा —
२. रंगभूमी.com या Website वर Subscribe करून YouTube, Instagram, Twitter तसेच Facebook Account यापैकी ३ संकेतस्थळांवर FOLLOW करा.
काही शंका अथवा प्रश्न असतील तर [email protected] या ई-मेल ID वर आमच्याशी संपर्क साधा.