मराठी रंगभूमीला नाट्य स्पर्धांची मोठी परंपरा लाभली आहे. मनोरंजन क्षेत्रात काम करणारे आघाडीचे कलाकार याच स्पर्धांमधून पुढे येतात आणि पुढच्या पिढीला आदर्श वाटेल असं काम करत जातात. या कलाकारांना घडवण्यात नाट्य स्पर्धांचा मोठा वाटा असतो. उत्तम कलाकृती आणि उत्तम कलाकार निवडून त्याना रंगमंच उपलब्ध करून देण्याचं महत्वाचं काम नाट्य स्पर्धा करत असतात.
अशाच नामांकित स्पर्धांपैकी एक असणारी स्पर्धा म्हणजे ‘सुवर्ण कलश राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा’! अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरीवली शाखेतर्फे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. हे स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कलाकार यात सहभागी होतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ‘सुवर्ण कलश २०२४’ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
सुवर्ण कलश २०२४ – स्पर्धेचे नियम व अटी (Suvarna Kalash 2024 – Rules & Regulations)
स्पर्धेचे माध्यम मराठी असणार आहे. स्पर्धकांनी आपल्या प्रवेश अर्जासोबत सेन्सॉर प्रमाणपत्र प्रत, लेखक परवानगी पत्र जमा करायचे आहे. यावर्षी नोंदणी करणाऱ्या पहिल्या ३० संघाना स्पर्धेसाठी प्रवेश दिला जाणार आहे. एकांकिका सादरीकरणाचा कालावधी ३० ते ४० मिनिटांचा असेल. स्पर्धेत एक संस्था एकापेक्षा जास्त एकांकिका सादर करू शकते. मात्र एक कलाकार एकापेक्षा जास्त एकांकिकेत काम करत असेल तर कोणत्या एकांकिकेतील त्याचा अभिनय परितोषिकासाठी ग्राह्य धरण्यात यावा याची नोंद स्पर्धेपूर्वी आयोजकांकडे लेखी स्वरूपात करणे आवश्यक असणार आहे. १७ ऑगस्ट २०२४ ला संध्याकाळी ७ वाजता एकांकिका प्राथमिक फेरी सोडत काढण्यात येणार आहे. त्याच वेळी अंतिम फेरीचे १० विनामूल्य पास सहभागी संघांना देण्यात येणार आहेत.
सुवर्ण कलश २०२४ – स्पर्धेचे स्वरूप (Suvarna Kalash 2024 – Ekankika Competition Details)
ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये घेतली जाणार आहे. प्राथमिक फेरी २३, २४, २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून पोयसर जिमखाना केंद्र, रघुलीला मॉलजवळ कांदिवली, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीचा निकाल २५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याच दिवशी अंतिम फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
अंतिम फेरी २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजल्यापसून प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे मुख्य नाट्यगृहात होणार आहे. अंतिम फेरीत नेपथ्यमांडणी, प्रकाशयोजना, एकांकिका सादरीकरण ह्या सर्वांसाठी १ तासाचा कालावधी असेल. अंतिम फेरीतील सर्वसाधारण रंगभूषा आयोजकांतर्फे देण्यात येईल. विशेष रंगभूषा असल्यास त्याची व्यवस्था संघाने स्वतंत्र करावी. अंतिम फेरीत ६ स्पॉट, ६ x ४ x १.५० फुटाच्या चार लेवल, ६ x ४ x ९ इंचाच्या दोन लेवल व खुर्च्या देण्यात येतील. याव्यतिरिक्त नेपथ्याची आवश्यकता असल्यास ती कलाकारांनी स्वतंत्रपणे करावी. अंतिम फेरीत एकांकिका सादरीकरणापूर्वी संहितेच्या व कलाकार तंत्रज्ञ यादीच्या ३ प्रती आयोजकांकडे देणे आवश्यक आहे.
पारितोषिके
प्रथम पारितोषिक — ₹२१,००० आणि सुवर्णकलश चषक
द्वितीय पारितोषिक – ₹१५,००० आणि सुवर्णकलश चषक
तृतीय पारितोषिक- ₹१०,००० आणि सुवर्णकलश चषक
व अन्य वैयक्तिक पारितोषिके
स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया
स्पर्धेचा अर्ज येथे क्लिक करून डाऊनलोड करा.
या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे २७ ऑगस्ट २०२४ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत! आपले अर्ज अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बोरिवली शाखेच्या कार्यालयात किवा [email protected] या ईमेल आयडीवर स्वीकारले जातील. या स्पर्धेची प्रवेश फी आहे ₹२०००/- जी स्पर्धक प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन किवा बोरिवली नाट्य परिषदेच्या बँक खात्यात NEFT द्वारे ट्रान्सफर करू शकतात.
तेव्हा सर्व कलाकारांनी सवर्ण कलशाची सुवर्णसंधी हातातून जाऊ देऊ नका! लगेच सहभागी व्हा, कोणास ठाऊक कदाचित या वर्षी तुमचं नाव सुवर्ण कलशावर कोरलं जाईल!