नाटक हे कधीच कार्यक्रम म्हणून न पाहता एक प्रयोग म्हणून पाहिले जाते कारण कार्यक्रम एकदाच होतात. त्यात काही फारसे बदल होत नाही पण प्रयोग हे अनेक होतात आणि त्यात सातत्याने बदल होत असतात. असेच ७ वर्षांपासून ‘नाट्य प्रयोग‘ आपल्यासाठी एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा भरवते तर यंदाच्या वर्षी सह आयोजन आमची वसई यांनी केले आहे. एकपात्री अभिनय स्पर्धेची फिरता चषक पद्धत असून यंदाच्या वर्षी या स्पर्धेची प्रवेश करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. रंगमंचावर अभिनयाचा कस, सर्वांना खेळवून ठेवण्याची वृत्ती या स्पर्धेत महत्वाची ठरेल.
स्पर्धेसाठी आजपर्यंत प्रमोद शेलार, संकेत तांडेल, मनीष सोपारकर, दिनेश शिंदे, विनोद देहरे रमाकांत वाकचौरे असे उत्तम परीक्षक लाभले. स्पर्धा संस्था नवीन असली तरी ४० हून अधिक स्पर्धक दरवर्षी सहभागी होतात. यावर्षी स्पर्धेचे चित्रिकरण हे रंगमंच चॅनेल वर होणार असुन सर्व सादरीकरणाचे व्हिडिओ नाट्यप्रयोग यांच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध होणार आहे.
नियम व अटी
• २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विरंगुळा केंद्र, मिरा रोड येथे स्पर्धा घेण्यात येईल.
• ही स्पर्धा १५ वर्षांवरील कलाकारांसाठी आहे.
• सादरीकरणाची वेळ कमीत कमी ४ मिनिटे तर जास्तीत जास्त ६ मिनिटे असेल
• स्पर्धेचे प्रवेश शुल्क १००/- आहे.
• अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा → अली नगरकर – ७०३०३२५२६६
पारितोषिके
• प्रथम पारितोषिक : रोख रक्कम ३०००/- आणि सन्मानचिन्ह
• व्दितीय पारितोषिक : रोख रक्कम २०००/- आणि सन्मानचिन्ह
• तृतीय पारितोषिक : रोख रक्कम १०००/- आणि सन्मानचिन्ह
• ३ उत्तेजनार्थ पारितोषिके : रोख रक्कम २००/- आणि सन्मानचिन्ह.
नाट्य प्रयोग सदस्य
अधक्ष्य: अली नगरकर
उपाध्यक्ष: संकेत शेडगे
सचिव: निलेश पेंढारकर
उपसचिव: अक्रम कुरेशी
खजिनदार: मोहम्मद खान
रंगभूमी.com कडून स्पर्धक व आयोजक यांना शुभेच्छा. अशाच इतर स्पर्धेंबद्दल जाणून घेण्यासाठी रंगभूमी.com ला Subscribe करा.