एकांकिका स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद हळूहळू वाढत चालला आहे. अशीच एक मोठा प्रतिसाद मिळवणारी स्पर्धा म्हणजे कमल वसंत जाधव करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन छात्रशक्ती आणि तांडव थिएटरमधील तरुण मुलांनी नव्या ऊर्जेने केले आहे. हे या स्पर्धेचे ४ थे वर्ष असून दरवर्षी जवळपास १०० संघ स्पर्धक असणारी ही नाट्यस्पर्धा. या स्पर्धेची सुरुवात डॉ. जितेंद्र वसंत जाधव यांनी त्यांच्या आई कमल वसंत जाधव यांच्या नावाने केली.
“मी एक रंगकर्मी आहे. अनेक वर्ष अभिनेते, दिग्दर्शक म्हणून रंगभूमीची सेवा केली. वैद्यकीय जीवनात रुळत असताना मला पुन्हा रंगभूमीची ओढ निर्माण झाली आणि म्हणून नव्या रंगकर्मींसाठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. रंगभूमीकडून बरेच काही शिकण्याची भूमिका पार पडली आता नवीन नाट्यकर्मींना रंगमंच उपलब्ध करून देण्याची भूमिका पार पाडत आहे. यशस्वीरीत्या पार पडत असलेली स्पर्धा पाहून आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू मला सर्व काही सांगून जातात.”
— डॉ. जितेंद्र वसंत जाधव
कमल वसंत जाधव करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
- या स्पर्धेची प्राथमिक फेरी केंद्रानुसार घेतली जाईल तर अंतिम फेरी मुंबई येथे होईल.
- या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेत हौशी नाट्य संस्था, महाविद्यालय यांना सहभाग घेता येईल. एक संस्था किंवा महाविद्यालय जास्तीत जास्त दोन स्पर्धक संघ पाठवू शकेल. या बाबत आयोजकांचे सर्वाधिकार राहतील.
- प्राथमिक फेरी डिसेंबर २०२२ पासून पुणे, अहमदनगर, नाशिक, कणकवली व मुंबई (मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, रायगड, वसई, विरार, पालघर) या केंद्रांवर होईल. मुंबई केंद्राची प्राथमिक फेरी कल्याण येथे घेण्यात येईल. स्पर्धक संस्था आपल्या सोयीचे कोणतेही केंद्र निवडू शकते.
- अंतिम फेरी १४ जानेवारी २०२३ ला अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे घेण्यात येईल.
- एकांकिकेचा कालावधी हा ३० ते ४५ मिनिटांचा असेल. तर एकांकिकेत किमान २ पात्र असावे.
- अंतिम फेरीत १ तास अवधी दिला जाईल. या अवधीत एकांकिकेचे सादरीकरण, नेपथ्य लावणे काढणे, प्रकाशयोजना, संगीत व इतर बाबी पूर्ण केल्या जाणे बंधनकारक आहे.
- एक अभिनेता/अभिनेत्री यांना या स्पर्धेत एकापेक्षा जास्त एकांकिकेत अभिनय करता येणार नाही, तसे लक्षात आल्यास वा आणून दिल्यास त्या दोन्ही एकांकिका कोणतीही सूचना न देता बाद करण्यात येतील.
- प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत निवड झालेल्या एकांकिकेचे कलाकार बदलता येणार नाही.
- सर्व स्पर्धक संघानी त्यांना दिलेल्या तारखेस व वेळेत (रीपोर्टिंग वेळेनुसार प्राथमिक फेरीच्या २ तास आधी व अंतिम फेरीच्या ३ तास आधी) उपस्थित राहणे बंधनकारक आहे. एखादी संस्था दिलेल्या वेळेत गैरहजर राहिल्यास तिला बाद ठरविले जाईल व पुढील संस्थेस त्यावेळेत आपले सादरीकरण करावे लागेल. बेशिस्त वर्तन अथवा अन्य संघाना त्रास होईल असे वर्तन केल्यास त्या संघास स्पर्धेतून बाद केले जाईल.
- अंतिम फेरीत एकांकिका सादरीकरणासाठी बाहेर गावच्या संस्थाना यथायोग्य प्रवाससहाय्य भत्ता देण्यात येईल.
- सदर स्पर्धेच्या आयोजनाबाबत आयोजकांचा आणि निकालाबाबत परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल, याची नोंद घ्यावी.
अंतिम फेरीसाठी उपलब्ध सुविधा
- ४×६×९ – ४ लेव्हलस्
- ४×६×१८ – ४ लेव्हलस्
- ४ ठोकळे
- १० स्पॉट, डिमर्स, २ स्टॅण्ड
- आयोजकांतर्फे ४ पात्रांसाठी रंगभूषाकार विनामुल्य असेल.
- नेपथ्य, प्रकाशयोजना, साउंड सिस्टीम, रंगभूषा या करिता अतिरिक्त साहित्य हवे असल्यास संबंधीतांचे मोबाईल नंबर दिले जातील,त्यांच्याशी बोलून व्यवहार ठरवून घेणे. सदर व्यवहारास आयोजक जबाबदार नसतील.
कमल वसंत जाधव करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा – प्रवेश अर्ज
- प्रवेश अर्ज PDF स्वरूपात उपलब्ध अथवा Google Form स्वरूपात ganai.org.in/tandav या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
- प्रवेश करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२२ आहे.
- स्पर्धेचे प्रवेश शुल्क ₹१००० (एक हजार) आहे. प्रवेश शुल्क खाली दिलेल्या खात्यात जमा करावा.
Ac Name: Dr. Jitendra Jadhav
Ac No.: 03880100016913
IFSC: BARBOMULEAS (Bank of Baroda, Mulund East Branch)
- एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणस्तव परत केले जाणार नाही.
- प्रवेश अर्जा सोबत संहितेची १ प्रत, सेन्सॉर सर्टिफिकीटची १ प्रत / डी.आर.एम्. नंबर व लेखकाचे परवानगी पत्र असणे बंधनकारक आहे. लेखकाच्या संमत्तीपत्राची व डी. आर. एम. क्रमांकाची संपूर्ण जबाबदारी स्पर्धक संस्थेची राहील.
- प्रवेश शुल्क आणि सर्व अर्जाची पूर्तता केल्याने प्रवेश स्विकारला जाईल.
कमल वसंत जाधव करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा – पारितोषिके
- प्रथम पारितोषिक — ₹५०,०००
- द्वितीय पारितोषिक — ₹३०,०००
- तृतीय पारितोषिक — ₹२०,०००
- उत्तेजनार्थ (२ संघ) — ₹१०,०००
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
भावेश गंभीर :- ८४५१८५८०७०
मंथन :- ९३५९२१२७१९
सर्व स्पर्धकांना आणि आयोजकांना रंगभूमी.com कडून खूप शुभेच्छा!