कोरोना महामारीनंतर पुन्हा आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे. हिंदी आणि उर्दू भाषेची नाटकं सादर करण्यासाठी मानाची मानली जाणारी मोठी स्पर्धा म्हणजे इप्टा (Indian People’s Theatre Association) संस्थेतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धा (Inter Collegiate Drama Competition – ICDC). यावर्षी या स्पर्धेचे ४९ वे वर्ष आहे व ते जोमाने सादर करण्याची विद्यार्थ्यांमध्ये तयारी दिसत आहे. ICDC 2022 ची प्राथमिक फेरी १२, १३ आणि १४ सप्टेंबर रोजी होणार असून अंतिम फेरी २० सप्टेंबरला होईल. प्रवेश करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे.
IPTA Mumbai
इंडियन पीपल्स थिएटर असोसिशनची स्थापना मुंबईमध्ये २५ मे १९४३ रोजी मारवारी शाळेत झाली. स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात रंगभूमीसाठी काम करणारी ही संस्था अनेक दिग्गजांनी उभारली. इप्टाचे हे ८० वे वर्ष. समूहातील काही सुरुवातीच्या सदस्यांमध्ये पृथ्वीराज कपूर, बिजोन भट्टाचार्य, बलराज साहनी, ऋत्विक घटक, उत्पल दत्त, ख्वाजा अहमद अब्बास, सलील चौधरी, पंडित रविशंकर, ज्योतिरिंद्र मोईत्रा, निरंजन सिंग मान, एस. तेरा सिंग चान, जगदीश फर्यादी हे होते. खलीली फरियादी, राजेंद्र रघुवंशी, सफदर मीर, हसन प्रेमानी, अमिया बोस, सुधीन दासगुप्ता अशा अनेक नावांचाही समावेश होता. अभिनेते पृथ्वीराज कपूर हे इप्टाचे महत्वाचे घटक होते. त्यांच्या निधनानंतर १९७२ साली त्यांच्या स्मरणार्थ आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आणि सर्वोत्कृष्ट निर्मात्याला पृथ्वीराज कपूर स्मृतिचिन्ह देण्याचे ठरवले. इप्टाने आजवर अनेक हिंदी आणि उर्दू भाषिक नाटके सादर केली. शतरंज के मोहरे हे उर्दू नाटक तसेच आखरी शमा या इप्टा प्रस्तुत नाटकांनी ५० वर्ष पूर्ण केली.
IPTA ICDC 2022 – नियमावली
प्राथमिक फेरी पु. ल. अकादमी मिनी थिएटर येथे होणार आहे.
- सर्व सहभागी, अभिनेते आणि बॅकस्टेज कामगार हे मुंबई विद्यापीठाचे प्रामाणिक विद्यार्थी असले पाहिजेत, त्याची संलग्न महाविद्यालये किंवा सरकारी उच्च शिक्षणाच्या मान्यताप्राप्त संस्था असावेत. खाजगी संस्थांचे विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेस पात्र नाहीत.
- दिग्दर्शन, रंगमंच सजावट आणि लाइट्स यासारखी तांत्रिक मदत गैर-विद्यापीठ स्रोतांकडून घेतली जाऊ शकते.
- छोटी नाटके हिंदी, उर्दू किंवा हिंदुस्थानी असू शकतात.
- नाटकाला साहित्यिक मूल्य आणि आशय असायला हवा आणि तशी काळजी पटकथा निवडताना घेतली पाहिजे. प्रभारी प्राध्यापकाने स्क्रिप्ट वाचून त्यावर महाविद्यालय/संस्थेच्या शिक्क्यासह त्यांची/तिची मान्यतेची स्वाक्षरी लावावी.
प्रवेश अर्जाचा PDF फॉर्म आणि अधिक नियमावली येथे उपलब्ध आहे →
IPTA ICDC 2022 – पारितोषिके
- सर्वोत्तम निर्मिती:
- प्रथम – पृथ्वीराज कपूर फिरता चषक, ₹१०००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र.
- द्वितीय – मनमोहन कृष्ण फिरता चषक, ₹८००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र.
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आर.एम.सिंग ट्रॉफी फिरता चषक, ₹४००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र.
- सर्वोत्तम लेखन – के.ए.अब्बास फिरता चषक, ₹४००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र.
- क्रिटिक्स अवॉर्ड – कैफी आझमी फिरता चषक, ₹४००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र (अंतिम किंवा एलिमिनेशन राऊंडमधून कोणत्याही नाटकाला दिले जातील).
- अभिनयासाठी वैयक्तिक पुरस्कार:
- उत्कृष्ट कामगिरी (पुरुष किंवा महिला)- बलराज साहनी ट्रॉफी फिरता चषक, ₹६००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता- ए.के. हंगल ट्रॉफी फिरता चषक, ₹४००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- शौकत कैफी फिरता चषक, ₹४००१/- रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र.
सर्व महाविद्यालयीन कलारांना शुभेच्छा. इप्टाच्या पुढील अपडेट्ससाठी रंगभूमी.com ला फॉलो आणि सबस्क्राईब करा.
1 Comment
Yes