[UPDATE] महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास ५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
सर्वसामान्य मराठी माणसात एक कलाकार लपलेला असतो. रोजच्या धावपळीत, जगण्याच्या धडपडीत हा कलाकार कुठेतरी सुटत जातो. पण या लपलेल्या कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नव्या दमाच्या कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी १९६१ पासून महाराष्ट्र सरकार राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये नवनवीन संशोधन व्हावे या उद्देशाने नाट्य, नृत्य, संगीत, लोककला, साहित्य व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्यासाठी सतत कार्यरत आहे.
याच उद्देशाने शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचनालयाच्या वतीने दि. १५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दि. १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. २०२४ हे वर्ष, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६३ वे वर्ष आहे.
६३ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२४-२०२५ – माहिती व नियमावली (63rd Rajya Natya Spardha Details)
ही स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुंगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खरगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. या बद्दल माहिती देताना श्री. बिभीषण चवरे (संचालक, सांस्कृतिक कार्यालय) यांनी सांगितलं की, २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑक्टोबर २०२४ पासून १० वेगवेगळ्या केंद्रावर सुरू होणार असून ६२ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर २०२४ पासून आयोजित करण्यात येणार आहे.
६३ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२४-२०२५ – प्रवेश अर्ज (63rd Rajya Natya Spardha Entry Form)
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थाना तसेच मागील वर्षी नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थाना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम महाराष्ट्र संचनालयाच्या www.mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाइन सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाही. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किवा संपूर्ण तपशील भरलेला नसल्यास प्रवेशिका भरता येणार नाही.
६३ वी राज्य नाट्य स्पर्धा २०२४-२०२५ – नियमावली (63rd Rajya Natya Spardha Rules and Regulations)
राज्य नाट्य स्पर्धा – नियमावली
राज्य नाट्य स्पर्धा – प्रतिज्ञापत्र
राज्य नाट्य स्पर्धा – बँक तपशील
स्पर्धेसाठी नाट्यसंस्थेची निवड झाल्यास शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेला प्रयोग सादर केला जाईल. जर सदर संस्थेने प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरिता शासन नियम बंधनकारक असतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरवण्यात येईल.
‘कोणत्याही कलाकाराला भूक असते ती शाबासकीची! मोठ्या संख्येने कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन कलक्षेत्रात मान्यवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांकडून शाबासकी मिळवण्याची ही सुवर्णसंधी सोडू नये’ असं आव्हान श्री. बीभीषण चवरे यांनी केलं आहे.
How to Submit Entry for 63rd Maharashtra Rajya Natya Spardha 2024-2025
To apply for the 63rd Maharashtra Rajya Natya Spardha 2024-2025 and submit an entry form for the competition, please follow the steps detailed on the mahanatyaspardha.com website.