माणसाच्या आयुष्यात भीती, राग, संताप, द्वेष, हिंसा, वेदना, दुःख, वासना, हव्यास, उन्माद, आत्मग्लानी असे असंख्य भाव काळ, घटना आणि सभोवताल यांच्या आधारावर जन्म घेत असतात. यापैकी काही भाव इतरांकडे व्यक्त होतात. तर काही मनातच दाटून राहतात. या सर्व भावभावना एकप्रकारे माणसाच्या जीवनातील अंतर्बाह्य ‘डबरी’च आहेत. ‘बाहेरच्या अवकाशातील डबर’ ते ‘माणसाच्या आतील डबर जे अधिक तीव्र आहे’ इथपर्यंतचा प्रवास, म्हणजे प्रत्यय कोल्हापूर निर्मित, अतुल पेठे संकल्पित आणि दिग्दर्शित नाटक ‘डबर’ (Debris)! कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ ही नाट्यसंस्था रंगभूमीवरील गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. याच नाट्यसंस्था तर्फे आयोजित, ‘रंगसंगत’ ही नाट्य कार्यशाळा दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या कार्यशाळेत रंगभूमी विषयी सर्व…
Author: श्रेयस सोनार
‘मन’ हे माणसाच्या शरीरातील कोणतेही अवयव अथवा इंद्रिय नसून, ‘मन’ म्हणजे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा आणि विलक्षण शक्ती असलेला प्रमुख घटक आहे, असे आपल्याला सतत जाणवत राहते. “मनाने जर एखादा निश्चय केला तर माणूस जगात काहीही साध्य करू शकतो!”, असे आपण कित्येकदा म्हणतो. मनातील संवेदनांचे प्रतिबिंब माणसाच्या वागण्या-बोलण्यात उमटत असतात. माणसाचे व्यक्तिमत्त्व हे त्याच्या मनाच्या रचनेवर अवलंबून असते. मात्र ‘मन’ हीच जर समस्या असेल तर काय असेल त्या समस्येचे निराकरण? हाच प्रश्न घेऊन, अभिनय कल्याण निर्मित, विजयलता प्रोडक्शन प्रस्तुत, NCPA सादर करीत आहेत चं. प्र. देशपांडे लिखित, अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित एकपात्री मराठी नाटक ‘मन’! चं. प्र. देशपांडे यांनी मनाच्या विविध…