डिसेंबर २०२४ मध्ये अनेक व्यावसायिक नाटकांचा मराठी रंगभूमीवर शुभारंभ होतोय. अनेक नवी व्यावसायिक मराठी नाटकं रंगमंचावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यापैकीच काही नाटकं म्हणजे, ‘स्क्रिप्टीज क्रिएशन्स’ + ‘रंगाई’ निर्मित, संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष दिग्दर्शित ‘असेन मी.. नसेन मी…’, ‘अस्मय थिएटर्स’ + ‘प्रवेश क्रिएशन्स’ निर्मित, नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी’ आणि ‘गौरी थिएटर्स’ निर्मित, ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’ प्रकाशित, अद्वैत दादरकर लिखित आणि दिग्दर्शित ‘शिकायला गेलो एक!’. तसेच मराठी रंगमंचावर एक जुनं अजरामर झालेलं, ‘मोरया भूमिका अथर्व’ निर्मित, ‘जाई काजळ आयुर्वेदिक अंजन’ प्रस्तुत, जयवंत दळवी लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘पुरुष’ हे नाटक…
Author: श्रेयस सोनार
कोल्हापुरातील ‘भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र’ ही संस्था गेली २५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे. नाट्यनिर्मिती, नाट्यप्रशिक्षण, साहित्य आणि भाषा विषयक प्रकल्प असे अनेक महत्त्वाचे उपक्रम या संस्थेत सातत्याने राबविले जातात. ‘डॉ. हिमांशू स्मार्त’ यांच्या मार्गदर्शनाखाली भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र तर्फे ‘सर्जनशाळा’ ही नाट्यनिर्मिती चालवली जाते. याच भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, सर्जनशाळा प्रस्तुत आणि ‘केल्याने भाषांतर, पुणे’ निर्मित ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ या नाट्यसंचाचा महोत्सव पुणे येथील The Box आणि The Box 2 येथे २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. पुण्यातील ‘केल्याने भाषांतर’ ही संस्था म्हणजे परकीय भाषांमधून आधी इंग्रजी आणि मग मराठीत भाषांतर असा प्रवास न करता थेट मराठीत…
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (कोल्हापूर शाखा) आयोजित, सांस्कृतिक महोत्सव हा नुकताच कोल्हापुरात दिनांक ४,५ व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहाने पार पडला. या महोत्सवाची सुरुवात ही शुक्रवार ४ ऑक्टोबर पासून झाली. महोत्सवाचे प्रथम कार्यक्रम हे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा’ आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा प्रयोग असे होते. पुढच्या दिवशी शनिवारी ५ ऑक्टोबर ला ‘नवस’ एकांकिका आणि ‘अमेरिकन अल्बम’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. त्यानंतर महोत्सवाचा अंतिम दिवस ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे दोन अंकी मराठी संगीत नाटक सादर झाले. सर्व कार्यक्रम आणि नाट्य…
एकांकिका स्पर्धा म्हणजे हौशी नाट्यक्षेत्रातील नव्या पिढीच्या कलाकारांसाठी फारच जवळचा विषय. मग ती पुरुषोत्तम करंडक असो किंवा सवाई एकांकिका स्पर्धा, नव्या पिढीचे सर्वच कलाकार या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. यावर्षीचा, म्हणजेच २०२४ चा स्पर्धांचा सीझन आता सुरू झालाय. पुरुषोत्तम करंडकाची नांदी झालेली आहे व तसेच अनेक नवे करंडकही या वर्षी तयार होत आहेत. अशातच एक नवी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, सर्व विद्यार्थी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू होणार आहे. जिचं नाव आहे, ‘सकाळ करंडक’! सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेचा प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी, तसेच स्पर्धेचे नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचा. Sakal Karandak 2024 Ekankika Competition सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका…
“अरे केशवरावला आग लागली, ये लवकर” पासून रडत रडत “डोळ्यांसमोर सगळं संपलं रे” पर्यंतचा प्रवास कोल्हापूरकरांनी ८ ऑगस्टच्या रात्री केला. कोल्हापूरचे वैभव मानलं जाणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह रविवारी रात्री आगीच्या भक्षस्थानी पडलं. लहानपणापासून शालेय बाल राज्य नाट्य स्पर्धा, ते आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, ते हौशी राज्य नाट्य स्पर्धा, ते प्रायोगिक नाट्य महोत्सव आणि शेवटी एखादं व्यावसायिक नाटक.. असा प्रवास कोल्हापुरातील प्रत्येक रंगकर्मींनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात केला असावा. कोल्हापुरातील एकमेव सुसज्ज नाट्यगृह असल्यामुळे बऱ्यापैकी सगळी व्यावसायिक नाटकं इथेच सादर होतात. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक दिग्गज कलाकार याच रंगमंचावर घडले. आता सुद्धा जी नवी पिढी आहे ती सुद्धा याच रंगमंचावर घडत होती.…
गुरुवारी दिनांक ९ ऑगस्ट दरम्यान कोल्हापुरात झालेली भीषण दुर्घटना आपण सर्वजण जाणतोच. नाट्यकलाकार व नाट्यरसिकांचे अत्यंत जवळचे असे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या विळख्यात आले आणि संपूर्ण नाट्यसृष्टीत व संपूर्ण कोल्हापुरात हळहळ पसरली. अनेकांचे फार मोठ्ठे आर्थिक व त्याहून अधिक भावनिक नुकसान झाले! भस्मसात झालेल्या नाट्यगृहाच्या धक्क्यातून सावरत असताना, कोल्हापूर मधला प्रत्येक रंगकर्मी एकीकडे त्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी साठी एकत्र येतोय, तर दुसरीकडे ‘आता कोणतेच व्यावसायिक नाटक कोल्हापूर मध्ये येणार नाही!’, असा विचार त्याला सतावत आहे. केशवराव भोसले नाटयगृह एवढा मोठ्ठा वारसा लाभलेलं, एवढ्या आसन क्षमतेचं, सर्व सोयीनियुक्त, दुसरं कोणतंच थिएटर कोल्हापूर मध्ये नाही. नाट्यगृह पुन्हा आधी सारखं झाल्यावर सुद्धा जम बसवण्यास…
महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे गेले कित्येक वर्ष, महाविद्यालयातील तरुण विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देणारी, पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहेत. ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गेले ५८ वर्ष जोमाने पार पडते. स्पर्धेचं हे वर्ष विशेष यासाठी आहे कारण, राजाभाऊ नातू या मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकाराचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते पुण्याच्या नाट्यचळवळीतील सक्रिय कार्यकर्तेही होते. पुण्यातील ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ या नाट्यसंस्थेमार्फत इ.स. १९६३ सालापासून आयोजिल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेच्या घडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. Purushottam Karandak 2024 – Prathamik Feri Pune या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, फक्त लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीन गोष्टींना अधिक महत्त्व या स्पर्धेत दिले जाते. मागील…
गेली अनेक वर्षे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी म्हणून विविध स्पर्धा भरवत आहे. त्यापैकीच एक महत्वाची स्पर्धा म्हणजे ‘व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धा’. यंदाचं या स्पर्धेचं ३४ वं वर्ष! या स्पर्धेत जिंकण्यासाठी व्यावसायिक नाट्य मंडळींचा बराच कस लागतो. ही स्पर्धा गेल्या काळात अनेक दिग्गजांनी गाजवली आहे. यावर्षी नऊ दमदार नाटकांमध्ये, २४ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे अंतिम फेरी पार पडली. सामना तोडीस तोड रंगला. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 34th Marathi Vyavsayik Natya Spardha Results व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झालेल्या ९ नाटकांपैकी, स्वप्नील जाधव लिखित आणि दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट…
गेल्या काही वर्षात निर्मिती झालेल्या व्यावसायिक, मनोरंजक आणि ग्लॅमरस नाटकांकडे तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की फार निवडक नाटकं अशी आहेत जी प्रायोगिक आशय जपून ठेवणारी आहेत. हौशी नाट्य निर्मिती करणाऱ्या संस्था, अशी प्रायोगिक नाटकं फक्त राज्य नाट्य स्पर्धेपुरतीच मर्यादित ठेवतात. असे प्रायोगिक विषय पूर्वी गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे यांसारख्या दिग्गज लेखकांच्या संहितांमध्ये दिसून यायचे. मात्र अलीकडच्या काळात नवीन प्रायोगिक लेखन दिसणं कठीणच झालंय! विचार करायला लावणाऱ्या ‘प्रायोगिक’ नाटकांचं लेखन फारसं बघायला मिळत नाही. पण या मताला अपवाद म्हणून लेखक दत्ता पाटील यांचे नाव घेता येईल. त्यांनी लिहिलेल्या अनेक संहिता याचं उदाहरण असू…
कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर आहे, हे आपण सर्वच जाणतो. कलाक्षेत्रात अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात, प्रेक्षक आणि नाट्यसंस्था यांची मांदियाळीच आहे. आजही अनेक नाट्यसंस्था या नाटक, एकांकिका व अभिवाचन यांचे सादरीकरण अथवा नाट्यप्रशिक्षणाची शिबिरे आयोजित करत असतात. त्यातलीच एक जुनी व नावाजलेली संस्था म्हणजे, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर! या संस्थेला मूळ वारसा हा संगीताचा असला, तरी नाट्य चळवळीत या संस्थेचा नाट्यविभाग नेहमी कार्यरत असतो व तशी नाट्य परंपरा देखील या विभागाला लाभलेली आहे. वाचिक अभिनय ही वाणी, बोलणे आणि शब्दोच्चारातून भावना व्यक्त करण्याची कला आहे. नाट्यवाचन, कथाकथन, आकाशवाणीवरून होणारी नभोनाट्ये ही वाचिक अभिनयाची काही उदाहरणे आहेत. शब्दाच्या केवळ उच्चारावरून…
महाराष्ट्र शासन गेली कित्येक वर्षे, राज्यातील सर्व कलांचे संवर्धन व विविध कलांना प्रोत्साहन आणि कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. याकरिता, महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरांवर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्यांतील सर्वांत उत्तम उपक्रम म्हणून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धेकडे सर्वांचे पाहिले लक्ष जाते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्रात अनेक (सुमारे २०) केंद्रे असतात. २०२३ हे वर्ष, महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे ६२ वे वर्ष होते. तसेच महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे २० वे वर्ष होते. या ६२ व्या महाराष्ट्र हौशी मराठी राज्य नाट्य…
माणसाच्या आयुष्यात भीती, राग, संताप, द्वेष, हिंसा, वेदना, दुःख, वासना, हव्यास, उन्माद, आत्मग्लानी असे असंख्य भाव काळ, घटना आणि सभोवताल यांच्या आधारावर जन्म घेत असतात. यापैकी काही भाव इतरांकडे व्यक्त होतात. तर काही मनातच दाटून राहतात. या सर्व भावभावना एकप्रकारे माणसाच्या जीवनातील अंतर्बाह्य ‘डबरी’च आहेत. ‘बाहेरच्या अवकाशातील डबर’ ते ‘माणसाच्या आतील डबर जे अधिक तीव्र आहे’ इथपर्यंतचा प्रवास, म्हणजे प्रत्यय कोल्हापूर निर्मित, अतुल पेठे संकल्पित आणि दिग्दर्शित नाटक ‘डबर’ (Debris)! कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ ही नाट्यसंस्था रंगभूमीवरील गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. याच नाट्यसंस्था तर्फे आयोजित, ‘रंगसंगत’ ही नाट्य कार्यशाळा दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या कार्यशाळेत रंगभूमी विषयी सर्व…