३० ते ४५ मिनिटाच्या एकांकिकेच्या लेखनाचे कसब वाटायला जरी सोपे असले तरी हे अतिशय कौशल्याचे काम आहे. उत्तम लिखाणाच्या जोरावरच एकांकिका रंगमंचावर बहरून येते आणि म्हणूनच लेखणी ही कुठल्याही यशस्वी नाटकाचा पाया आहे असे मानले जाते. या अशा महत्वपूर्ण लेखनाला अधिक वाव मिळावा आणि उमलत्या लेखकांना त्यांचे विचार मांडायला एक स्थान मिळावं या हेतूने संजय भाकरे फाऊंडेशन आयोजित करत आहेत स्व. ज. रा. फणसळकरांच्या स्मृती प्रित्यर्थ एकांकिका लेखन स्पर्धा. नागपूर मधील संजय भाकरे फाऊंडेशन यांनी स्व. ज. रा. फणसळकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या एकांकिका लेखन स्पर्धेचे हे पहिलं वर्ष आहे. स्व. ज. रा. फणसळकर हे अतिशय उत्तम लेखक व अभिनेते…
Author: श्रेया पेडणेकर
कोविड १९ मुळे देशभरात लॉकडाऊनचे निर्बंध लागू झाल्यानंतर आता नाट्यगृहे पुन्हा उघडली आहेत आणि नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडत आहेत. लॉकडाऊनमुळे बंद झालेली बरीच नाटकं रंगभूमीवर पुन्हा पदार्पण करत आहेत. ‘नाट्यवाडा’ निर्मित ‘पाझर’ हे लॉकडाऊनपूर्वी पुरस्कारांची शंभरी पार केलेलं एक तुफान विनोदी नाटकसुद्धा पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करत आहे. येत्या १७ जुलै रोजी या नाटकाचा लॉकडाऊननंतरचा पहिला प्रयोग मुंबईमध्ये सादर होणार आहे. Paazar Storyline पाझर कथानक प्रवीण पाटेकर लिखित व दिग्दर्शित ‘पाझर’ हे दोन अंकी मराठी नाटक आहे. पाझर ह्या नाटकातील कथानक मराठवाड्यातील एका गावात घडतं. पाण्याचा प्रश्न ज्यांच्यासमोर न सांगता सतत उपस्थित असतो अशा एका गावात ७२…
कलाकार आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडणारी पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत ‘दाजीकाका गाडगीळ करंडक’ ही स्पर्धा कोविड १९ मुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या २ वर्षीय खंडानंतर पुन्हा एकदा नव्या जोमात सुरु होणार आहे. ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये पार पडते. २०१६ साली सुरु झालेल्या या स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे. दाजीकाका गाडगीळ करंडक दाजीकाका गाडगीळ हे पी. एन. जी. ज्वेलर्स या प्रसिद्ध सुवर्णपेढीचे संस्थापक होते. २०१४ साली झालेल्या त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ २०१६ पासून या स्पर्धेची सुरुवात झाली. दाजीकाका गाडगीळ यांचे नातू सौरभ गाडगीळ आणि अजय नाईक यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत दरवर्षी एका…
आपला समाज हा पूर्वीपासून जात, वर्ग, आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर विभागला गेला आहे. पण या समाजात असाही एक वर्ग आहे जो या सगळ्याच्या तळाशी येतो. सगळ्यात दुर्लक्षित आणि मागे राहिलेला, किंबहुना जाणूनबुजून मागे ठेवलेला समाज. तो म्हणजे मॅनहोल साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वर्ग. आपण एखाद्या नाल्याच्या बाजूने जरी गेलो तरी आपल्याला जो वास असह्य होतो, त्या वासातल्या आणि घाणीतल्या मॅनहोलमध्ये शिरून, हे कर्मचारी साफ सफाई करतात. त्या जीवघेण्या, असह्य वासातल्या मॅनहोलमध्ये उतरून आपण केलेली घाण त्यांना साफ करावी लागते. पण त्या बदल्यात आपल्या समाजात त्यांना साधं मानाचं स्थानदेखील मिळत नाही. एवढंच काय त्यांना पुरेसा पगारसुद्धा दिला जात नाही. त्यांच्या आयुष्याची ही…
गेली १० वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने कार्यरत असलेल्या थिएट्रॉन एंटरटेनमेंट या संस्थेने झी नाट्य गौरव पुरस्कार, मटा सन्मान, मेटा, थेस्पो, द रेड कर्टन इंटरनॅशनल इ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक नामांकने आणि बक्षिसे पटकावली आहेत. त्याचबरोबर, ही संस्था रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करून पुण्यातील नाट्यरसिकांचे लक्ष वेधून घेत आली आहे. ‘थिएट्रॉन एंटरटेनमेंट’ आणि ‘स्नेहा भावे प्रोडक्शन्स’ निर्मित ‘वार्ता वार्ता वाढे’ हे मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणारं एक नवीन विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात ६० हून अधिक कलाकार एकाच वेळी रंगमंचावर काम करताना आपल्याला दिसणार आहेत. या नाटकाचे लेखन ओंकार गोखले यांनी केले असून, सुरज पारसनीस हे या नाटकाचे…
मंडळी, नाटक बघण्यासाठी नाट्यगृहात न जाता, अख्खं नाटकच तुमच्या घरी आलं तर? ‘फिरतं नाटक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणत, टायनी टेल्स निर्मित आणि भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व सर्जनशाळा प्रस्तुत ‘कडेकोट कडेलोट’ या नाटकाची चर्चा शहरापासून ते अगदी गावोगावीही सुरु आहे. या नाटकाला स्टेज, लाईट्स, मोठ्या जागा यांची सक्तीने गरज नसल्यामुळे हे नाटक आतापर्यंत भरपूर गावांमध्ये व शहरांमध्ये पोहचू शकलं आहे. कल्पेश समेळ दिग्दर्शित ‘कडेकोट कडेलोट’ हे नाटक फ्रँका रामे लिखित ‘अ वुमन अलोन’ या मूळ नाटकाचा मराठी अनुवाद आहे. ७०च्या दशकात फ्रँका रामे या इटालियन लेखिकेने लिहिलेलं हे नाटक जगातल्या सर्व वर्गातल्या स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी भाष्य करतं. त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या भाषेत…
आपण सर्वांनी रत्नाकर मतकरी ह्यांच्या गूढ कथा वाचल्या असतीलच. मराठी साहित्यात मतकरी आणि गूढ ह्यांना समानार्थी मानले जाते. मत्करींच्या ह्याच गूढ कथा जर रंगभूमी वर अवतरल्या तर? कथांचे नाट्यरुपांतर बघायला काय मज्जा येईल ना! हीच अनोखी कल्पना तुमच्या समोर घेऊन येत आहेत ‘फॅक्टरी मंडळ’ प्रस्तुत ‘अकल्पित — एक रहस्यमय नाट्यदर्शन’. रत्नाकर मतकरी ह्यांच्या ‘हार’ आणि ‘बाबल्या रावळाचा पेटारा’ ह्या दोन गूढ व लघु कथांचे रूपांतर दीर्घांकी नाटकात करण्यात आले आहे. पहिल्या अंकात हार ह्या कथेचे सादरीकरण होईल व मध्यंतरानंतर दुसऱ्या अंकात बाबल्या रावळाचा पेटारा याचे सादरीकरण होण्यात येईल. योगेश उतेकर दिग्दर्शित ‘हार’ आपलं कुटुंब म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय. पण ह्याच…
मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य अतिशय कष्टाचे व घाणीचे असते. लोकांच्या भलाईसाठी, रस्ते साफ ठेवण्यासाठी, स्वास्थ्याला हानिकारक असलेल्या, विषारी वातावरणात आयुष्यभर काम करूनसुद्धा, त्यांना समाजात महत्वाचं, मानाचं स्थान मिळत नाही. एवढंच काय, त्यांच्या स्वास्थ्याची काळजी त्यांना घेता येईल एवढा पगारदेखील त्यांना दिला जात नाही. मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या या खडतर आयुष्याची कहाणी सांगणाऱ्या एका नवीन नाटकाने रंगमंचावर पदार्पण केलं आहे, ज्याचं नाव आहे ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’! ‘उन्मुक्त कलाविष्कार’च्या सहकार्याने, अस्तित्व संस्था, ठाणे रंगभूमीवर प्रस्तुत करत आहे उर्मी लिखित व दिग्दर्शित ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ हे नवंकोरं नाटक. हे नाटक मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वास्तवाची कथा सांगतं. या नाटकाच्या नेपथ्याची…
मंडळी, बच्चेकंपनीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेतच. या दिवसांमध्ये पालकांना पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांचे मनोरंजन करायचे तरी कसे? फिकर नॉट! आपल्या लाडक्या नाट्यसृष्टीने याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत बालनाटकांचे अनेक प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रेक्षागृहांमध्ये आपल्याला पाहता येणार आहेत. बालनाट्ये का पाहावीत? बाहेर जाऊन मुलांना २-३ तासांचे नाटक दाखवायचा प्रयत्न फारसे पालक नाहीच करत. सध्याच्या पिढीत मनोरंजनाची इतकी माध्यमं आहेत की बालनाटकांसाठी वेगळा वेळ फार कोणी काढत नाही. परंतु बालनाट्य ही खास लहान मुलांच्या कोवळ्या मनांसाठी बनवलेली असतात. त्यातल्या कथा, पात्र, नेपथ्य, त्यांच्या भावविश्वातल्या गोष्टींच्या अवती-भोवती आखलेल्या असतात. त्यांना आवडणारं एखादं कार्टून, किंवा त्यांनी पुस्तकात वाचलेली…
रसिक प्रेक्षकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण २६ मे, २०२२ रोजी ठाण्यात एक भव्य एकांकिका महोत्सव पार पडणार आहे. स्मित हरी प्रोडक्शन्स निर्मित व प्रणा थिएटर्स आयोजित रंगकर्मी एकांकिका महोत्सव! सन्मान कलेचा, उत्साह कलाकारांचा! नवोदितांना संधी मिळावी म्हणून हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. जास्तीत जास्त नवनवीन प्रेक्षक नाट्यगृहात यावे व त्यांनी नाटकं पाहावी हा या महोत्सवाचा प्रयत्न आहे. रंगकर्मी एकांकिका महोत्सव हा एकांकिकांचा महोत्सव आहे व कुठलीही स्पर्धा नाही.या महोत्सवात प्रत्येक संघ, प्रत्येक कलाकार आपल्या कलेचं सादरीकरण करतो. कलेचा सन्मान व्हावा आणि कलाकारांचा उत्साह वाढावा हा या महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे या महोत्सवामार्फत नवनवीन कलाकारांना रंगमंचावर काम…
कोविड-१९ मुळे आलेल्या अकस्मात लाटेमुळे संपूर्ण जग बंद पडलं. आणि त्याच बरोबर आपल्या नाट्यगृहांना सुद्धा कुलुपं लागली. त्याच दरम्यान ‘घरो-घरी नाटक’ या संकल्पनेचा जन्म झाला आणि ‘अमूर्त प्रोडक्शन्स’, ‘गुंता’ ही एकांकिका घेऊन आले. कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता प्रायोगिक तत्वांवर ‘गुंता’ हे नाटक प्रेक्षकांच्या घरी सादर केलं जातं. ह्या एकांकिकेचे प्रयोग घराच्या अंगणात, बाल्कनी, टेरेस, रंगमंच या ठिकाणांवर सादर केले जातात. कोविड-१९ अंतर्गत असलेल्या सगळ्या नियमांचे पालन या प्रयोगात केले जाते व अगदी मर्यादित प्रेक्षक सामिल होतात. त्यामुळे शांततेत, फक्त तुमच्यासाठी, या नाटकाचा प्रयोग तुमच्या घराच्या परिसरात घडवण्यात येतो. लॉकडाऊनमध्ये घरोघरी नाटक घेऊन जाणारी अमूर्त प्रोडक्शन्सची टीम आता नाट्यगृहात भेट…
वगनाट्य म्हणजे काय? वग म्हणजे ‘वगनाट्य तमाशा’तला एक महत्वाचा घटक. वगनाट्य तमाशा हे एक विनोदी लोकनाट्य आहे जे महाराष्ट्रात गावांमध्ये १८६५ सालापासून सादर केलं जातं. गण, गवळण, लावणी, बतावणी या सगळ्या लोकसाहित्याच्या प्रकारांच्या माध्यमातून वगनाट्याचा प्रयोग सादर होतो. वगाचे स्वरूप सामान्यतः नाटकासारखेच असते आणि त्याचे सादरीकरण तमाशाच्या शेवटी होते. या अखंड सादरीकरणातून वेगवेगळ्या कथा, चर्चा आणि विषय पुढे आणले जायचे. जेव्हा मनोरंजनाची इतर कुठलीही माध्यमं नव्हती, तेव्हा तमाशा आणि वगनाट्य हेच लोकांचे मनोरंजनाचे साधन होते. परंतु हा वगनाट्याचा प्रकार दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे. नवीन पिढीला वगनाट्य या प्रकाराबद्दल काहीच माहिती नाही आहे. वगनाट्य मराठी मातीत जन्मलेले लोकनाट्य आहे. आपल्या…